मुंबई : ख्रिस्तोफर नोलनचा चित्रपट 'ओपेनहायमर'ने भारतीय बॉक्स ऑफिसवर जोरदार ओपनिंग केली आहे. पहिल्या दिवशी हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये खूप गर्दी दिसली. टॉम क्रूझच्या मिशन: इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट १च्या पहिल्या दिवशाच्या कलेक्शनपेक्षा या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केली आहे. टॉम क्रूझच्या 'मिशन: इम्पॉसिबल ७'ने पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर १२.५ कमाई केली होती, तर 'ओपेनहाइमर' या चित्रपटाने १३.५० कोटीची कमाई केली आहे. 'ओपनहायमर' हा चित्रपट रॉबर्ट ओपेनहायमर ह्यांच्या जीवनावर आधारित आहे. ओपनहायमर हे एक अमेरिकन सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि दुसऱ्या महायुद्धात लॉस अलामोस प्रयोगशाळेचे ते संचालक देखील होते. तसेच जे. रॉबर्ट यांना अणुबॉम्बचे जनक म्हणून सुद्धा संबोधले जाते. ख्रिस्तोफर नोलनच्या चित्रपटात सिलियन मर्फी हे भौतिकशास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ओपेनहायमरच्या भूमिकेत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'ओपनहाइमर' चित्रपटाने केली जबरदस्त कमाई : हा चित्रपट दुसर्या महायुद्धादरम्यान सेट केलेला, बायोपिक असून या चित्रपटात त्यावेळी काय झाले होते, या सर्व गोष्टी चित्रपटाद्वारे सांगण्यात आल्या आहेत. 'ओपनहाइमर' चित्रपटाने सुरुवातीच्या दिवशीच भारतीय प्रेक्षकांवर जादू केली आहे, कारण या चित्रपटाला एकूण ४८.७६% व्याप मिळाला. या चित्रपटाला भारतात संमिश्र प्रतिसाद मिळत असून, 'ओपनहाइमर'ने आश्चर्यकारक कमाई करून आपले भारतीय बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले आहे. 'ओपेनहायमर' चित्रपटाचा जेव्हा टिझर रिलीज झाला होता त्यावेळी या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू होती.
चित्रपटाची स्टार कास्ट : 'ओपेनहायमर' चित्रपटात ओपेनहाइमरच्या आयुष्यातील विविध पैलूंचा समावेश आहे, ज्यात कम्युनिस्ट पक्षातील त्याचा सहभाग, जीन टॅटलॉक (फ्लॉरेन्स पग) सोबतचे त्याचे गुंतागुंतीचे नाते, नाझींविरुद्धच्या युद्धात त्याचा सहभाग, अशा अनेक गोष्टी पडद्यावर दाखविण्यात आल्या आहेत. ओपेनहाइमर यांचे शिक्षक म्हणून दिवस कसे गेले यांची उत्तम मांडणी या चित्रपटात केली आहे. या चित्रपटाशी पूर्णपणे गुंतण्यासाठी प्रेक्षकांना त्या विषयाबद्दल काही पार्श्वभूमी ज्ञात असणे अपेक्षित आहे. या चित्रपटात किलियन मर्फी, रॉबर्ट डाउनी ज्युनियर, एमिली ब्लण्ट, मॅट डेमन, फ्लोरेन्स पघ, गॅरी ओल्डमॅन, रॅमी मलिक यांच्यासारखे प्रसिद्ध स्टार कास्ट आहेत.
हेही वाचा :
- Atlee Kumar praised Bawal : जान्हवी कपूर आणि वरुण धवनच्या 'बवाल'चे दिग्दर्शक अॅटली कुमारने केल कौतुक
- Shiney Ahuja Passport Application: जामिनावर असलेला बॉलिवूड अभिनेता शायनी आहुजा निघाला परदेशी; पासपोर्टसाठी उच्च न्यायालयात धाव
- Vatsal sheth and ishita dutta : वत्सल सेठ आणि इशिता दत्ताचा रुग्णालयाबाहेरचा व्हिडिओ झाला व्हायरल...