ETV Bharat / entertainment

Akshay Kumar News : स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमारने सोशल मीडियावर शेअर केली 'ही' पोस्ट - Akshay Kumar social media troll

अभिनेता अक्षय कुमारने आता भारतीय नागरिकत्व घेतले आहे. याबाबत त्याने स्वत: माहिती सोशल मीडियावर दिली आहे.

Akshay Kumar News
अक्षय कुमार भारतीय नागरिकत्व
author img

By

Published : Aug 15, 2023, 1:01 PM IST

Updated : Aug 15, 2023, 3:16 PM IST

मुंबई: कॅनडाचे नागरिकत्व असलेल्या अभिनेता अक्षय कुमारला नेहमीच ट्रोल केले जाते. परंतु हा वाद मिटण्याची शक्यता आहे. अक्षय कुमारने सोशल मीडियावर फोटो शेअर करत भारतीय नागरिकत्व मिळाल्याचे जाहीर केले आहे. दिल आणि नागरिकत्व हे दोन्ही भारतीय असल्याचे अक्षय कुमारने म्हटले आहे.

अक्षय कुमारने ट्विट करत म्हटले की, ह्रदय आणि नागरिकत्वदेखील भारतीय आहे. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. जय हिंद. अक्षय कुमारने भारतीय नागरिकत्व मिळाल्याचा फोटो ट्विट केला आहे. त्यावर काही वापरकर्त्यांनी अभिनंदन तर काहींनी मजजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही वापरकर्त्यांनी घरवापसीच्या शुभेच्छा असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी सोशल मीडियात खूप ताकद असल्याचे म्हटले आहे. तर एका वापरकर्त्याने म्हटले की, तुमचे अभिनंदन. मात्र, तरीही चित्रपट फ्लॉपच होणार आहेत. चार चित्रपट अपयशी झाल्यानंतर भारताच्या नागरिकत्वाची आठवण झाली आहे. सरकारचा अनुयय सोडून खरे अभिनेता झाल्यानंतर तुम्ही खरे भारतीय होणार असल्याचे एका वापरकर्त्याने म्हटले आहे.

गदर२ शी ओमजीची आहे टक्कर -अक्षय कुमार हा सातत्याने देशभक्तीपर चित्रपटात भूमिका करतो. त्याची भाजपशीदेखील जवळीक आहे. मात्र, कॅनडाचा नागरिक असल्याने सोशल माध्यमातून अक्षय कुमारला आजवर नेहमीच ट्रोल केले जाते. त्याच्या देशप्रेमावर शंका उपस्थित केल्याने त्याने अनेकवेळा नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, अक्षय कुमारचे बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले आहेत. अशात ओएमजी २ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याच्या दिवशी अभिनेता सनी देओलचा गदर २ प्रदर्शित झाला आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर व्यवसाय करण्याची तीव्र स्पर्धा आहे.

चित्रपट सतत फ्लॉप झाल्यानंतर काय म्हणाला होता अक्षय कुमार? जर तुमचा चित्रपट चालत नसेल तर ती तुमची चूक आहे. तुमच्यासाठी बदलण्याची वेळ आली असून तसा मी प्रयत्न करत आहे. जेव्हा चित्रपट चालत नाहीत, तेव्हा प्रेक्षक किंवा इतर कोणालाही दोष देऊ नका. निर्माते रोहित शेट्टीचा सूर्यवंशी हा अक्षय कुमारचा शेवटचा हिट चित्रपट आहे. हा चित्रपट कोरोनाच्या संकटानंतर २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. 2022 मधील चित्रपटगृहात प्रदर्शित झालेले त्याचे जवळपास सर्वच चित्रपट अयशस्वी ठरले आहेत. याचबरोबर 'रक्षा बंधन' आणि 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर निराशजनक कामगिरी ठरली होती. अक्षयचा 2023 चा पहिला चित्रपट 'सेल्फी' देखील फ्लॉप ठरला होता.

हेही वाचा-

  1. Omg 2 box office collection day 4 : 'ओह माय गॉड २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० कोटींचा टप्पा केला पार

Last Updated : Aug 15, 2023, 3:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.