मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार हा त्याचा आगामी 'ओ माय गॉड २' या चित्रपटामुळे फार चर्चेत आहे. या चित्रपटाची वाट प्रेक्षक फार दिवसापासून पाहत आहेत. या चित्रपटाद्वारे धार्मिक भावना दुखल्या जाणार असल्याच्या बातम्या समोर येत आहे. त्यामुळे आदिपुरूष सारखा हा चित्रपटही वादाच्या भोवऱ्यात अडकेल का असा एक प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान आता 'ओ माय गॉड २' या चित्रपटावर सेन्सॉर बोर्ड हे कात्ररी लावण्याच्या तयारीत आहे, असे दिसत आहे. कारण या चित्रपटाबद्दल सध्या फार विरोध होताना दिसत आहे. या चित्रपटाचा टिझर हा वादात असल्याने या चित्रपटावर खरचं बंदी येईल का? हे आपण जाणून घेवूया...
'ओ माय गॉड २' वादात अडकेल : 'ओ माय गॉड २' चा टीझर या महिन्यात, निर्मात्यांनी रिलीज केला, जो अक्षयच्या चाहत्यांना आवडला. मात्र आता या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी ऐकायला मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेन्सॉर बोर्डाने अक्षयच्या चित्रपटाला अजूनही चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी प्रमाणपत्र दिलेले नाही. रिलीजपूर्वी हा चित्रपट रिव्ह्यू कमिटीकडे जाणार आहे. या चित्रपटात काही दृश्ये आक्षेपार्ह असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे सेन्सॉर बोर्ड चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल विचार करत आहे. सध्या सेन्सॉर बोर्ड पूर्णपणे चित्रपटाची पडताळणी करत आहे. त्यानंतर चित्रपटाच्या बंदीवर विचार केल्या जाणार आहे.
टीझरला विरोध : या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच या चित्रपटाला विरोध झाला. या चित्रपटाच्या टिझरवर अनेक नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया येत आहे. अनेकांनी अक्षयच्या लूकविषयी आणि चित्रपटाच्या कहाणी विषयी विरोध केला आहे. या चित्रपटच्या माध्यामातून धार्मिक भावना दुखावल्या जावू शकते त्यामुळे सेन्सॉर बोर्ड चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पुर्वी फार विचार करून योग्य तो निर्णय घेणार आहे. एका युजरने प्रतिक्रिया देत म्हटले की, ‘या चित्रपटात सनातन धर्माची मस्करी होऊ नये’ तर दुसऱ्या एकाने म्हटले, अपेक्षा हीच आहे की सनातन धर्माचा आदर केला जावा' असे अनेकजण आपली प्रतिक्रिया देत आहे.
या चित्रपटात अक्षयने साकारली शिवजीची भूमिका : ‘ओह माय गॉड २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित राय यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय भगवान शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपटत ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :