मुंबई : अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम स्टारर चित्रपट 'ओ माय गॉड २'ला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'ओ माय गॉड २' चित्रपटला २७ कट मिळाल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने 'अ' सर्टिफिकेट दिले. इतक्या निर्बंधानंतरही हा चित्रपट बॉक्स दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. 'ओ माय गॉड २'ने १०० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर ओलांडला आहे.
'ओ माय गॉड २'ची कमाई : 'ओ माय गॉड २'ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १० कोटी २६ लाखांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी कमाईत ४९ टक्क्याने वाढ झाली. या चित्रपटाने १५ कोटी ३ लाखांचा व्यवसाय केला. तिसऱ्या दिवशी १७ कोटी ५५ लाखांची कमाई केली. पहिल्या आठवड्यात चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन ८५ कोटी ५ लाख होते. दुसऱ्या आठवड्याबद्दल बोलायचे झाले तर शुक्रवारी चित्रपटाने ६ कोटी ३ लाखांची कमाई केली. आता शनिवारी या चित्रपटाने जवळपास १० कोटींचा व्यवसाय केला आहे. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन १०१.५८ कोटींवर पोहोचले आहे. हा चित्रपट प्रौढ शिक्षणावर आधारित आहे.
चित्रपटाची कहाणी : मुलांना प्रौढ शिक्षणाचे ज्ञान असणे किती महत्त्वाचे आहे हे या चित्रपटातून लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार शिवाच्या दूताची भूमिका साकारत आहे. दुसरीकडे, पंकज त्रिपाठी, कांती शरण मुद्गल, एका दुकानदाराची भूमिका साकारत आहे, ज्याचे साधे जीवन आहे. जेव्हा त्याचा मुलगा विवेक (आरुष वर्मा)ला त्याच्या सेक्सुअलिटीवर शाळेत काही मुले चेष्टा करतात, तेव्हा त्याला आपले जीवन संपविण्याची इच्छा होते. या घटनेने दुखावलेल्या कांती शरण मुद्गल हा न्यायालयाचा दरवाजा ठोकवितो. इथे कांती आपल्या मुलासाठी लढण्याबरोबरच प्रौढ शिक्षणाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक असल्याचा धडा देऊन खटला जिंकतो. अमित राय दिग्दर्शित 'ओ माय गॉड २' मध्ये यामी गौतम, पंकज त्रिपाठी आणि रामायण फेम अरुण गोविल यांच्या भूमिका प्रमुख आहे. हा चित्रपट पंकज त्रिपाठी यांच्या व्यक्तिरेखेभोवती फिरतो. त्यांनी कांती शरण मुद्गल आणि शिवभक्ताची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात कलाकारांनी खूप चांगला अभिनय केला आहे.
हेही वाचा :