ETV Bharat / entertainment

Nysa Devgan poses : कथित बॉयफ्रेंड आणि मित्रांसोबत पोज दिल्यामुळे नीसा देवगण ट्रोल - नीसा देवगण

अजय देवगण आणि काजोलची मुलगी नीसा देवगण पुन्हा एकदा मित्रांसोबतच्या फोटोंमुळे ट्रोल झाली आहे. अलिकडेच तिने कथित बॉयफ्रेंड वेदांत महाजन आणि मि्त्रांसोबत पार्टी केली. यावेळचे फोटो व्हायरल झाले असून नेटिझन्स तिला ट्रोलर करत आहेत.

Nysa Devgan poses
नीसा देवगण ट्रोल
author img

By

Published : Aug 4, 2023, 7:41 PM IST

मुंबई - अजय देवगणची मुलगी नीसा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी तिला फॉलो करणारे लोक प्रचंड आहेत. तिच्या बद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक असतात. यावेळी मात्र ती ट्रोलर्सच्या रडारवर आली आहे. अलिकडेच तिचा मित्र ओरहान अवत्रामणी उर्फ ओरी आणि तिचा कथित बॉयफ्रेंड वेदांत महाजन यांचा स्नॅपशॉट व्हायरल झाला आहे. एका पार्टीला हे स्टार किड्स एकत्र असताना काढलेल्या या फोटोमुळे नीसा ट्रोल झाली आहे.

वेदांत महाजनने त्यांच्या अल्ट्रा-कूल पार्टीतील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. यात नीसा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये जवळच्या मैत्रिणींसोबत फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. नीसा आणि वेदांत महाजन बऱ्याचदा वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झालेले असल्यामुळे त्यांच्या वाढलेल्या जवळीकतेची खूपदा चर्चा झाला आहे.

वेदांत महाजन हा एक व्यावसायिक आहे आणि इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय तो करतो. यापूर्वी अनेकदा तो नीसा देवगणसोबत डेट करताना दिसला आहे. त्याला काही लोक मिस्ट्री मॅन म्हणूनही ओळखतात, कारण त्याच्याबद्दल फारशी माहिती लोकांना नाही आणि ही माहिती सोशल मीडियावरही मिळत नाही.

नीसा हिला वेदांत आणि मित्रांसोबतच्या फोटोत पाहिल्यानंतर नेटिझन्सचे लक्ष वेधले गेले. त्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी नीसाला ट्रोल करण्यास सुरूवात केली. तिच्या इन्स्टाग्रामवरील तिचे फोटो, अधून मधून ती डेट करत असताना स्पॉट झालेले फोटो, पार्ट्यांच्यामध्ये मित्रांसोबत वावरतानाचे बोल्ड फोटो नेटिझन्सना खटकत असतात. तिच्या या वागण्याबद्दल लोक तिला नेहमी टोचून बोलत असतात. आजपर्यंत तरी याचा कोणताही परिणाम नीसावर झालेला नाही.

नीसाने ट्रोलिंगचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिच्या त्वचेचा रंग आणि परिधान करत असलेल्या ड्रेसवरुन यापूर्वी अनेका तिच्यावर टीका झाली आहे. अलिकडे नीसा एका मुलांच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. तेव्हा तिने हिंदीत संवाद साधला, पण तिच्या हिंदीवरुनही काही जणांना खटकले होते आणि तिला ट्रोल केले होते.

नीसा बॉलिवूड प्रवेश करणार का याबद्दल कोणतीच स्पष्टता नाही. तिचे आई बाबा बॉलिवूडमधील आघाडीचे स्टार, निर्माता असल्यामुळे त्यांना अफाट चाहता वर्ग आहे. नीसावर ते पालक म्हणून भरपूर प्रेम करतात हे वारंवार दिसून आले आहे. अलिकडेच एकदा काजोलला नीसाला काय मार्गदर्शन करतेस याबद्दल विचारण्यात आले होते. त्यावेळी काजोल म्हणाली की, 'पापाराझींना कसे सामोरे जायचे हे मी तिला शिकवू शकत नाही, तिच्याच अनुभवाने ती शिकेल.'

हेही वाचा -

१. Aaliyah Kashyap engagement : पाहा, आलिया कश्यप आणि शेन ग्रेगोयरच्या एंगेजमेंटचे अप्रतिम फोटो

२. Aaliyah Kashyap engagement bash : आलिया कश्यपच्या एंगेजमेंटला स्टार किड्सची मांदियाळी, सुहाना ते पलक तिवारीची कथित बॉयफ्रेंडसोबत हजेरी

३. Ghoomer trailer out: हात गमवलेल्या झुंझार क्रिकेटरची प्रेरणादायी कथा 'घुमर'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.