ETV Bharat / entertainment

Ram Charan diwali bash : राम चरणच्या दिवाळी पार्टीत राजा कुमारीसोबत थिरकला सुपरस्टार चिरंजीवी - राम चरणच्या दिवाळी पार्टीत राजा कुमारी

Ram Charan diwali bash : रॅपर गायिका राजा कुमारीच्या गायनावर रामचरणसह चिंरजीवीलाही नाचण्याचा मोह आवरता आला नाही. राम चरण आणि उपासना कोनिडेला यांनी घरी आयोजित केलेल्या दिवाळी सेलेब्रिशन पार्टीमध्ये अनेक स्टार्ससह राजाकुमरीनं धमाल परफॉर्मन्स सादर केला.

Ram Charan diwali bash
राम चरणच्या दिवाळी पार्टीत राजा कुमारी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 11:42 AM IST

हैदराबाद - Ram Charan diwali bash : राम चरण आणि उपासना कोनिडेला यांनी आयोजित केलेल्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये गायिका राजा कुमारी हिनं जबरदस्त परफॉर्मन्स केला. तिनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तेलगू अभिनेता चिरंजीवी तिच्यासोबत शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातील टायटल ट्रॅकवर नाचताना दिसत आहे. हैदराबादमधील चिरंजीवींच्या निवासस्थानी आयोजित हा भव्य कार्यक्रम शहरातील सर्वात चर्चेचा विषय ठरला होता.

दिवाळी सेलेब्रिशन पार्टीचे लोन आता बॉलिवूडनंतर साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्येही प्रथा होऊ लागलीय. सेलेब्रिटींच्या घरी दिवाळी निमित्त पार्यांचं आयोजन सुरू झालंय. चिरंजीवाच्या हैदराबादमधील घरी अशाच एक भव्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे दिग्गज सेलेब्रिटींची हजेरी लावली होती.

प्रसिद्ध गायिका राजा कुमारीनं यावेळी आपल्या दिलखेचक गाण्यांचा परफॉर्मन्स दाखवत सेलेब्रिटींना आपल्या गाण्याच्या तालावर थिरकायला भाग पाडलं. तिने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर इव्हेंटमधील असंख्य फोटो आणि व्हिडिओ प्रदर्शित केले आहेत. आजबाजुला तेलुगु बोलणं ऐकताना पार्टीमध्ये आनंद झाला. मोगास्टार चिरंजीवीसोबत लाभलेला सहवासानं भारावून गेलेल्या राजाकुमारीनं पोस्टच्या कॅप्शनमध्ये आभार मानले आहेत.

भारतीय-अमेरिकन रॅपर म्हणून नावजलेली गायिका राजाकुमारीनं तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या पोस्ट्समध्ये राम चरण, अल्लू अर्जुन, लक्ष्मी मंचू आणि इतर अनेकांनी लाईक केलंय. तिनं आपल्या गाण्यावर सेलेब्रिटींना बेभान होऊन नाचायला भाग पाडलं.

सेलिब्रेशनमध्ये तिनं तिचे नवीन चार्टबस्टर ठरलेलं जवान चित्रपटाचं शीर्षक गीत देखील सादर केले. राम चरण आनंदाने तिच्या बरोबरच्या बीट्सवर नाचत होता, तर चिरंजीवीही या गाण्याच्या नृत्यात शेवटी सामील झाला. राजाकुमारीसोबत चिंरजीवीनं केलेला डान्स उपस्थितांचे आकर्षण ठरला होता.

राजा कुमारी हिनं 'जवान' चित्रपटाच्या शीर्षक गीतासाठी अनिरुद्ध रविचंदरसोबत काम केले होते. यावेळी तिने बॉलिवूडबद्दलची तिची आवड आणि या गाण्यामुळे तिला तिच्या भारतीय मुळांशी कसे जोडले गेलंय हे व्यक्त केलं. राजा कुमारी नावाने ओळखल्या जाणार्‍या स्वेथा यल्लप्रगदा राव हिनं सुष्मिता सेनची मुख्य भूमिका असलेल्या 'आर्या 3' मधील 'शेरनी आयी' नावाच्या ट्रॅकसाठी गायन केलंय.

हेही वाचा -

  1. Bigg Boss 17 Day 31 Highlights: बिग बॉसमध्ये अंकिता लोखंडे विक्की जैनपासून विभक्त, अनुराग ढोबळला शो सोडण्याची इच्छा

2. Aquaman 2 Vs Dunky : शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाच्या एक दिवस आधीच रिलीज होणार 'अ‍ॅक्वामन 2'

3. Tiger 3 Enters 100 Crore Club : सलमान कॅतरिनाच्या 'टायगर 3' ने 2 दिवसात केला 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.