ETV Bharat / entertainment

Akshay Kumars OMG 2 : ओटीटीवर नाही तर थिएटरमध्ये झळकणार ओएमजी २, अक्षय कुमारने जाहीर केली तारीख

ओ माय गॉड या चित्रपटाचा सिक्वेल थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतलाय. अक्षय कुमारने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Akshay Kumars OMG 2
ओ माय गॉड
author img

By

Published : Jun 9, 2023, 12:29 PM IST

मुंबई - ओ माय गॉड हा चित्रपट २०१२ मध्ये सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता. अतिशय नास्तिक असलेला कांजी लालजी मेहता भूकंपामध्ये त्याच्या झालेल्या नुकसानीला ईश्वराला जबाबदार धरतो आणि आपली भरपाई मिळावी म्हणून धर्माचा पुरस्कार करणाऱ्यांच्या मागे लागतो. या चित्रपटातून धर्मचिकेत्सेचा मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आला. चित्रपटाला सामान्य प्रेक्षकांनी उचलून धरले आणि बॉक्स ऑफिसवरही सिनेमाचा बोलबाला झाला. या चित्रपटाचा सिक्वेल येणार अशी चर्चा काही महिन्यांपासून सुरू होती. आता ओएमजी २ च्या निर्मात्यांनी अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेल्या सिक्वेल चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर निश्चित केली आहे. अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्याने लिहिले: आम्ही येत आहोत, तुम्हीही या. ११ ऑगस्ट रोजी ओएमजी २ थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.

काही आठवड्यांपूर्वी असे सांगितले जात होते की ओएमजी २ हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज न होता थेट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. पण चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. ओ माय गॉड २ या सिक्वेल चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम देखील आहेत.

ओ माय गॉड 2 या चित्रपटाचे अमित राय यांनी दिग्दर्शन केले असून कथा भारताच्या शिक्षण प्रणालीवर, विशेषत: प्रौढ शिक्षणावर लक्ष केंद्रित असेल. भारतात निरक्षरतेचे प्रमाण अद्यापही मोठे आहे. ग्रामिण भागात शिक्षणाच्या प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची होणारी गळती, मुलींच्या शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष, गरिबी आणि इतर समस्यांमुळे वाढत जाणारी स्थलांतरे, विटभट्या, उसतोड कामगार व कामासाठी प्रवासी मजूरांची होणारी ससेहोलपट यामुळे मुलांच्या शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष हा भाग तर आहेच पण प्रौढ साक्षरतेच्या मोहिमा राबवून त्यात आलेले अपयश हादेखील मोठा मुद्द आहे. या सामाजिक विषयाकडे ओएमजी २ हा चित्रपट लक्ष वेधेल अशी अपेक्षा आहे. या चित्रपटाची थीम खूप महत्वाची आहे आणि रिलीजच्या रणनीतीवर कोणताही निर्णय घेताना या चित्रपटाला निमशहरी आणि ग्रामिण प्रेक्षकांची आवश्यकता आहे. हा विचार करुनच सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा -

१. Diljit Dosanjh : पंजाबी गायक दिलजीत दोसांझ हा अमेरिकन गायिका टेलर स्विफ्टसोबत झाला स्पॉट

२. Miss World 2023 Competition : भारत भूषवणार मिस वर्ल्डच्या 71व्या स्पर्धेचे यजमानपद...

३. Gadar 2 Movie Controversy: गदर 2 चित्रपट शूटिंग वादाच्या भोवऱ्यात...शीख संघटनांनी 'त्या' दृश्यावर आक्षेप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.