ETV Bharat / entertainment

Parineeti Chopra : परिणीती चोप्रा हनिमून ऐवजी गेली गर्ल्स ट्रिपवर; फोटो केले शेअर... - परिणीती चोप्रा हनिमून

Parineeti Chopra : अभिनेत्री परिणीती चोप्रानं इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती मालदीवला असल्याचं दिसत आहे. परिणीती हनिमून ऐवजी गर्ल्स ट्रिपला सध्या गेली आहे, त्यामुळे सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे.

Parineeti Chopra
परिणीती चोप्रा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 1:32 PM IST

मुंबई - Parineeti Chopra : अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या लग्नामुळे खूप चर्चेत आहे. परिणीतीने 24 सप्टेंबर रोजी आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांच्याशी विवाह केला. हे लग्न राजस्थानमध्ये उदयपूरला शाही थाटामाटात पार पडले. या जोडप्यानं विवाह झाल्यानंतर काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले होते. फोटोत आणि व्हिडिओत या दोघांची केमिस्ट्री ही खूप जबरदस्त दिसत होती. दरम्यान आता सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये परिणीती हनिमून ऐवजी गर्ल्स ट्रिपला गेली आहे.

Parineeti Chopra
परिणीती चोप्रा

परिणीती चोप्रानं शेअर केले फोटो : परिणीती चोप्रानं दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिनं लिहलं, 'मी माझ्या हनिमूनवर नाही गर्ल्स ट्रिपवर आहे'. परिणीती चोप्रानं आज, 16 ऑक्टोबर रोजी सकाळी मालदीवमधील बीचवरील काही खास फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये परिणीतीनं गुलाबी बांगड्या भरलेला दिसत असून तिनं हातात कॉफीचा कप पकडलेला आहे. तिचे दोन्ही फोटो खूप सुंदर आहेत. दरम्यान, सध्या राघव चढ्ढा हे राजकारणात खूप सावध आहेत. अलीकडेच, दिग्गज आप नेते संजय सिंग यांची ईडीनं चौकशी केली, त्यानंतर त्यांना तुरुंगात पाठविण्यात आले.आता परिणीतीचे पती राघव चढ्ढा यांचे संपूर्ण लक्ष त्यांच्या पक्षावर आहे. राघव चढ्ढा हे आगामी 2024 च्या निवडणुकीच्या तयारीत गुंतले आहेत.

फॅशन वीकमध्ये झळकली : यापूर्वी परिणीती ही लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसली होती. यावेळी तिनं रॅम्पवर वॉक केला होता. परीचे रॅम्प वॉक करतानाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नानंतर परिणीती पहिल्यांदाच फॅशन शोमध्ये झळकली. यावेळी ती पेस्टल रंगाची साडी, गळ्यात हार, मांग सिंदूर आणि हातात बांगड्यासह दिसली. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला. या लूकचे अनेकांनी कौतुक केले आहे. आता सध्या परिणीतीचा 'मिशन राणीगंज' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर सुरू आहे. या चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. 'मिशन राणीगंज' चित्रपटामध्ये तिच्यासोबत अक्षय कुमार आहे.

हेही वाचा :

  1. Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' च्या ग्रँड प्रीमियरची दमदार सुरुवात, जाणून घ्या कोण आहेत नवे स्पर्धक
  2. Kuch Kuch Hota Hai Special Screening : 'कुछ कुछ होता है'ला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मुंबईत आयोजित केले स्पेशल स्क्रिनिंग...
  3. Urvashi Rautela Iphone : भारत-पाकिस्तान सामना पाहणं पडलं महागात; उर्वशी रौतेलाचा सोन्याचा 'आयफोन' हरवला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.