ETV Bharat / entertainment

Nita Ambani hugs SRK : नीता अंबांनीने मारली शाहरुख खानला मिठी, अँटिलियातील गणेश उत्सवात सेलेब्रिटींची मांदियाळी - Nita Ambani hugs Shah Rukh Khan

Nita Ambani hugs SRK : मुंबईतील अँटिलिया बिल्डिंगमध्ये अंबानी कुटुंबाच्या गणेश उत्सवाला अनेक सिलेब्रिटींनी मंगळवारी हजेरी लावली. अनेक क्षेत्रातील दिग्गजांसह बॉलिवूड कलाकारांचीही मांदियाळी येथे पाहायला मिळाली. यावेळी शाहरुख खानने नीती अंबानी यांना मिठी मारल्याचा प्रसंग चर्चेचा विषय बनला.

Nita Ambani hugs SRK
शाहरुखने नीता अंबांनीना मारली मिठी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 3:57 PM IST

मुंबई - Nita Ambani hugs SRK: अंबानी कुटुंबाच्या गणेश चतुर्थी उत्सवातील फोटो सेशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुंबईतील अँटिलिया बिल्डिंगमध्ये अंबानी कुटुंबाच्या गणेश उत्सवाला अनेक सिलेब्रिटींनी मंगळवारी हजेरी लावली. यामध्ये क्रिकेटसह बॉलिवूड सेलेब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली. पापाराझीने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधलं. अंबानींच्या घरी आगमन झालेल्या गणेश मूर्तीच्या दर्शनासाठी शाहरुख खान आपल्या खानदानासह हजर होता.

पापाराजी अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, शाहरुख खान यजमान नीता अंबानी यांना मिठी मारण्यासाठी त्यांच्या दिशेने येताना दिसतो. नीता अंबानीही शाहरुखला भेटल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचा आनंद लपवून ठेवू शकल्या नाहीत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत.

  • Welcome home Ganpati Bappa Ji. Wishing you and your family a wonderful day honoring Lord Ganesha. May Lord Ganesha bless all of us with happiness, wisdom, good health and lots of Modak to eat!!! pic.twitter.com/d9Adfl1ggs

    — Shah Rukh Khan (@iamsrk) September 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शाहरुख खानला नीता अंबानी यांनी मायेनं मिठी मारल्याचं शाहरुखच्या चाहत्यांना वाटतंय. श्रीमती अंबानी यांना शाहरुखला भेटून सार्थक झाल्यासारख वाटत असेल असे एकने लिहिलंय.

या व्हायरल व्हिडिओमध्ये शाहरुख नीता अंबानी यांच्या भेटीनंतर अनेकांना भेटताना दिसतोय. त्यानंतर त्याने गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं. या वेळी शाहरुख खानसोबत पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना खान आणि मुलगा अबराम हजर होते. गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर पुजाऱ्याने शाहरुखला भगवे उपरणे भेट दिले. त्याचा त्यानं नम्रतापूर्वक स्वीकार केला.

अंबानी कुटुंबाच्या गणपती दर्शनासाठी बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायसह तिची मुलगी आराध्या, माधुरी दीक्षित आणि डॉ. नेने, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा, रेखा, अनिल कपूर, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग, जान्हवी कपूर, खुशी कपूर, बोनी कपूर, सारा अली खान, इब्राहिम अली खान, जुही चावला, जेनेलिया आणि रितेश देशमुख असे बॉलिवूड कलाकार हजर होते.

शाहरुखने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बाप्पाकडे त्याने सर्वांसाठी सुख, बुद्धी, उत्तम आरोग्य आणि भरपूर मोदक खायला मिळोत अशी आम्ही प्रार्थना केली.

बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या जवान चित्रपटाच्या यशाचा आनंद सध्या शाहरुख खान घेत आहे. अ‍ॅटली कुमार दिग्दर्शित जवान चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपती आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा -

१. Jawan Box Office Collection Day 14: 500 कोटी क्लबमध्ये प्रवेश केल्यानंतर जवानच्या कमाईत घट

२. Icc World Cup Anthem : क्रिकेट वर्ल्डकपचं अधिकृत अ‍ॅन्थम जारी, रणवीर सिंहनं केलाय धमाकेदार डान्स

३. ICC World Cup Anthem : क्रिकेट वर्ल्डकपचं अधिकृत अ‍ॅन्थम जारी, रणवीर सिंहनं केलाय धमाकेदार डान्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.