मुंबई - मुंबईत शुक्रवारी रात्री नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या भव्य उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला. भारतातील संगीत, नाटक, सिनेमा, चित्रकला, तृत्यकला या क्षेत्रातील प्रतिभावान दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला उपस्थिती दाखवली होती. या सोहळ्यातील सर्वात आकर्षणाचे नृत्य ठरले नीता अंबानी यांचा डान्स. रघुपती राघव राजाराम हा गीतावर त्यांनी अत्यंत सुरेख डजान्स सादर केला. अनेक नृत्यांगणाच्या साथीने नीता अंबानी या गाण्यावर मुख्य नर्तिका म्हणून नृत्य करताना दिसल्या. यामुळे त्यांच्यात असलेल्या या अनोख्या कलेचे सार्वत्रिक प्रदर्शन घडले.
-
Watch the beautiful performance by Nita M Ambani, specially choreographed for the premiere of ‘The Great Indian Musical: Civilization to Nation’ at the grand launch. #NitaMukeshAmbaniCulturalCentre #TheGreatIndianMusical #CultureAtTheCentre #NMACC pic.twitter.com/12uBFfa81z
— Nita Mukesh Ambani Cultural Centre (@nmacc_india) April 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Watch the beautiful performance by Nita M Ambani, specially choreographed for the premiere of ‘The Great Indian Musical: Civilization to Nation’ at the grand launch. #NitaMukeshAmbaniCulturalCentre #TheGreatIndianMusical #CultureAtTheCentre #NMACC pic.twitter.com/12uBFfa81z
— Nita Mukesh Ambani Cultural Centre (@nmacc_india) April 1, 2023Watch the beautiful performance by Nita M Ambani, specially choreographed for the premiere of ‘The Great Indian Musical: Civilization to Nation’ at the grand launch. #NitaMukeshAmbaniCulturalCentre #TheGreatIndianMusical #CultureAtTheCentre #NMACC pic.twitter.com/12uBFfa81z
— Nita Mukesh Ambani Cultural Centre (@nmacc_india) April 1, 2023
नीता अंबानींचा डान्सने वातावरण मंत्रमुग्ध - नीता अंबानींचा डान्स पाहून भारतभरातून आलेल्या सेलेब्रिटींनी आनंद व्यक्त केला. त्यांना उभे राहून टाळ्याच्या कडकडाटात दाद दिली. उपस्थितांनी दाखवलेले प्रेमा पाहून नीता अंबानीही भारावल्या होत्या. नीता अंबानी यांना भारतीय शास्त्रीय नृत्यकलेची आवड आहे. यामध्ये त्यांनी उत्तम प्रविण्य मिळवले आहे. खरंतर डान्समध्येच त्यांना करियर करण्याची इच्छा होती. परंतु आईच्या इच्छेखातर त्यांनी चार्टड अकाऊंटचे शिक्षण घेतले. नीता अंबानी या प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. कॉलेजच्या दिवसात त्यांनी आपल्या नृत्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. आजही त्या दररोज नृत्याचा सराव नियमित करीत असतात.
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची संकल्पना - नीता अंबानी यांच्या संकल्पनेतून नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) ची निर्मिती झाली आहे. भारतातील सर्व परफॉर्मिंग आर्ट्सला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी या संस्थेची स्थापना केली आहे. या भव्य सांस्कृतिक केंद्र तीन परफॉर्मिंग आर्ट स्पेसची ठिकाणी आहेत. यामध्ये भव्य 2,000-आसनी ग्रँड थिएटर उभे करण्यात आले आहे. तांत्रिकदृष्ट्या प्रगत असेलेले 250 आसनांचा स्टुडिओ थिएटर आणि डायनॅमिक 12S-सीट क्यूबही येथे आहे. यामध्ये आर्ट हाऊस, चार मजली समर्पित व्हिज्युअल आर्ट स्पेस देखील इथे उभे करण्यात आले आहे. या सांस्कृतिक केंद्राचा उद्देश भारत आणि जगभरातील सर्वोत्कृष्ट कलात्मक प्रतिभेचे प्रदर्शन घडवणे हा आहे. या ठिकाणी प्रतिष्ठापनांच्या बदलत्या श्रेणीमध्ये निवास करण्याच्या उद्देशाने जागतिक संग्रहालय मानकांनुसार तयार केले आहे. भारतातील सर्वात मोठ्या पिचवाई पेंटिंगपैकी एक - 'कमल कुंज' यासह प्रसिद्ध भारतीय कलाकार आणि जागतिक कलाकारांच्या सार्वजनिक कलेचे मोहक मिश्रण केंद्राच्या परिसरांमध्ये सर्वत्र विखुरलेले पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - Nmacc Inaugural Event : काळ्या सूटमधील शाहरुखला पाहून चाहते म्हणाले, 'अरे, हा तर आर्यन'