ETV Bharat / entertainment

Nick Jonas And Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने सोशल मीडियावर पोस्ट केले सुंदर फोटो - Nick Jonas

प्रियांका चोप्रा आणि पती निक जोनासने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत मालती देखील दिसत आहे. प्रियांका आणि निकचे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत.

Nick Jonas And Priyanka Chopra
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास
author img

By

Published : Aug 2, 2023, 1:49 PM IST

मुंबई : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे जोडपे कायमच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा प्रियांका आणि निक चर्चेत आले आहेत. प्रियांका आपला ४१ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी काही दिवसापूर्वी पती निक आणि मुलगी मालतीसोबत एका खास ठिकाणी गेली होती. प्रियांकाचे पोस्ट केलेले फोटो जुलै महिन्यातील आहेत. जुलै महिना प्रियांका आणि तिच्या छोट्या कुटुंबासाठी खूप सुंदर होता. जुलैमध्ये पती निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत प्रियांकाने खूप एन्जॉय केला. आता त्यांचे जुलै महिन्यातील फोटो निकने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्रियांका आणि निकमधील प्रेम आणि आपल्या लेकीबद्दल वाटणारा जिव्हाळा इथे स्पष्ट दिसून येत आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये निकने हार्ट इमोजीसह ' जुलै हा एक चित्रपट होता, असे त्याने सांगितले आहे.

प्रियांका चोप्रा निकच्या मांडीवर बसलेली दिसली : निक जोनासने शेअर केल्या फोटोमध्ये पहिल्या फोटोत, प्रियांका चोप्रा पती निकच्या मांडीवर बसलेली दिसत आहे आणि दुसऱ्या फोटोत, निकची मुलगी मालतीसोबत जहाजात दिसत आहे. तिसर्‍या फोटोत सूर्याचे दृश्य आहे, चौथ्या फोटोत निक दिसत आहे आणि पाचव्या फोटोत संपूर्ण कुटुंब समुद्रकिनाऱ्यावर आनंद लुटताना दिसत आहे. दरम्यान नंतरच्या फोटोमध्ये निक हा प्रियांका चोप्रासोबत सूट-बूटमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये प्रियांकाने हिरव्या आणि काळ्या रंगाच्या कॉन्ट्रास्ट फ्लोरल ड्रेस परिधान केला आहे. निकच्या या फोटोवर १६ लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. या छोट्याशा सुंदर कुटुंबावर चाहते खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

प्रियांकाने शेअर केला फोटो : निकच्या पोस्टच्या काही तासांनंतर प्रियांकाने मालतीसोबत रात्रीच्या आकाशात चंद्राकडे पाहत असतानाचे दोन फोटो शेअर केले. या फोटोमध्ये प्रियांका आणि मालतीसोबत 'सुपर मून शोधत आहे,' असे तिने कॅप्शन दिले आहे. या फोटोमध्ये प्रियांकाने पांढर्‍या रंगाचा कॅज्युअल ड्रेस घातला आहे आणि दोघी माय - लेकी रस्त्यावर उभ्या आहेत. याशिवाय फोटोमध्ये मालती आकाशाकडे हात दाखवत आहे.

चाहत्यांनी केल्या कमेंट : निकने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहे. फोटोवर कमेंट करत एका चाहत्याने लिहले 'जीजू हे गोल' दुसरा चाहत्याने लिहले, 'दोघे एकत्र खूप सुंदर आहेत.' दरम्यान प्रियांकाने पोस्ट केलेल्या फोटोला सुद्धा तिचे अनेक चाहते लाईक करत आहेत. काही चाहत्यांनी मालती खूप क्यूट असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा :

  1. Rarkpk Box Office Collection Day 5: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या कमाईत बॉक्स ऑफिसवर घसरण....
  2. Nitin Desai Death: प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या
  3. Kangana Ranaut : कंगना रणौतची सुप्त इच्छा, विद्युत जामवालसोबतचा थ्रो बॅक व्हिडिओ शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.