ETV Bharat / entertainment

Nick and Priyanka : निक जोनासनं प्रियांका चोप्राचा फोटो शेअर करत 'जस्ट लुकिंग लाइक अ व्वा' ट्रेंड केला फॉलो - निक जोनासनं शेअर केला फोटो

Nick and Priyanka: निक जोनासनं पत्नी प्रियांका चोप्राचा एक फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती हिरव्या रंगाच्या साडीमध्ये खूप खास दिसत आहे. या फोटोवर निकनं स्पेशल कॅप्शन दिल आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 3:22 PM IST

मुंबई - Nick and Priyanka : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या दोघामधील केमिस्ट्री ही खूप जबदरस्त आहे, त्यामुळं अनेकजण त्यांचे कौतुक करताना सोशल मीडियावर दिसतात. प्रियांका अनेकदा आपल्या पतीसह मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान सध्या सोशल मीडियावर 'सो ब्युटीफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाइक अ व्वा'चा ट्रेंड सुरू आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हा ट्रेंड फॉलो करत आहे. अलीकडेच 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राचा पती निक जोनासनं एक फोटो शेअर करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. निकनं शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रियांकानं हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Priyanka chopra
प्रियांका चोप्रा

निक जोनासनं शेअर केला फोटो : प्रियांकानं मुंबईतील स्टार-स्टडेड इव्हेंटसाठी हिरवी साडी घातली. निक जोनासनं तिच्या लूकचे कौतुक केले आहेत. सोशल मीडियाचा व्हायरल व्हिडिओचा ट्रेंडला फॉलो करत असताना निक जोनासनं प्रियांकासाठी लिहिलं, 'सो ब्युटीफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाइक अ व्वा'. सध्या निक हा भावांसोबत टूरवर आहे. अलीकडेच दीपिका पदुकोण देखील या ट्रेंडमध्ये फॉलो केला होता. तिनं एक व्हिडिओ तयार केला होता. दरम्यान, काल मलायका अरोरानेही बॉयफ्रेंड अर्जुन कपूरवर कौतुकाचा वर्षाव केला आणि व्हायरल ट्रेंड फॉलो केला.

प्रियंका चोप्राने मुंबईचा निरोप घेतला : दरम्यान, गुरुवारी पहाटे, प्रियांका चोप्रा अमेरिकेला परत जात असताना मुंबईतील कलिना विमानतळावर दिसली. विमानतळाच्या आत जाण्यापूर्वी ती एका मित्राला मिठी मारत होती. यावेळी तिनं पापाराझीकडे पाहून हात दाखविला. प्रियांकानं इंस्टाग्रामवर स्टोरीमध्ये मुंबईचा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहलं, 'तुझी आठवण येईल मुंबई गुडबाय लवकरच भेटू'. प्रियांका चोप्रा ही मामी फिल्म फेस्टिव्हलसाठी मुंबईत आली होती. ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रानं अलीकडेच तिच्या करवा चौथ सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये तिनं चाळणी आणि चंद्राचा फोटो शेअर केला आहे. या करवा चौथला प्रियांका मुंबईत होती. तिनं करवा चौथ इथेच साजरा केला. आता प्रियांका चोप्रा अमेरिकेत परतली आहे.

हेही वाचा :

  1. Varun And Lavanya Marriage : चिरंजीवी आणि नागा बाबू यांनी सोशल मीडियावर वरुण तेज आणि लावण्याच्या लग्नाची फोटो केली शेअर
  2. Happy birthday SRK : शाहरुखचा थक्क करणारा अष्टपैलू प्रवास, रोमान्स किंग बनला अ‍ॅक्शन स्टार
  3. Dunki teaser released : शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित 'डंकी'चा टीझर प्रदर्शित; प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी किंग खान सज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.