ETV Bharat / entertainment

''थोडं गूढ आहे पण छान आहे'' म्हणत, इलियाना डिक्रूझने मायकेल डोलनसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा - Koa Phoenix Dolan

Ileana DCruz Relationship : इलियाना डिक्रूझ तिचा जोडीदार मायकेल डोलनसोबतच्या नात्याबद्दलचा अधिक तपशील सांगण्यास अद्यापही तयार नाही. काही गोष्टी गूढ असणं बरं असतं असंही ती म्हणते. इलियाना आणि मायकेल यांनी गेल्या ऑगस्टमध्ये मुलगा कोआ फिनिक्स डोलनचे स्वागत केले होते.

Ileana DCruz Relationship
इलियाना डिक्रूझ आणि मायकेल डोलन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2024, 12:04 PM IST

मुंबई - Ileana DCruz Relationship : इलियाना डिक्रूझ हिला ऑगस्ट महिन्यात कोआ फिनिक्स डोलन नावाचा मुलगा झाला. मुलाच्या जन्मापर्यंत तिने कोणाशी लग्न केलंय याबद्दल अथवा तिच्या रिलेशनशीपबद्दल गुप्तता पाळली होती. एका मुलाखतीत तिला जेव्हा ती सिंगल मदर म्हणून मुलाचं संगोपन कसे करते असे विचारताच तिने जोडीदार मायकेल डोलनचे नाव घेतले आणि तो मदत करतो हे सांगायला विसरली नाही. त्यानंतर काही फोटोही शेअर करत आपल्या बाळाचा बापही मायकेल डोलन असल्याचे स्पष्ट केले होते.

ती जेव्हा गर्भवती होती तेव्हाही तिने जोडीदार मायकेल डोलनचे नाव घेतले नव्हते. सध्या ती मुलासह मायकेलसोबत युएसमध्ये राहात आहे. अलिकडेच एका मुलाखतीत तिने प्रसूतीनंतरच्या नैराश्याची वास्तविकता उघड केली आणि मजबूत समर्थन प्रणालीची आवश्यकता अधोरेखित केली. मातृत्वाच्या आव्हानांवर चर्चा करताना, तिने भावनांचा आवेग आणि 'मॉम गिल्ट'च्या अनुभवाबद्दलही सांगितले. यावेळी इलियानाने मायकेलची प्रशंसा केली आणि सांगितले की, तो एक विलक्षण जोडीदार आहे जो तिला सर्व प्रकारच्या संकटातून सुखरूप बाहेर येण्यासाठी नियमित साथ देतो.

आपल्या मातृत्वाबद्दलचा दृष्टीकोन सोशल मीडियावर शेअर केल्यानंतरही आपल्या जोडीदाराबद्दलचा तपशील सांगताना इलियाना सावधगिरी बाळगताना दिसली. मे 2023 मध्ये मायकेलशी तिच्या कथित लग्नाबद्दल विचारले असता, तिने गुप्तता राखणे पसंत केले. "त्यात बऱ्याच गोष्टींचा गुंता आहे त्यामुळे ते सोडून देऊयात. थोडसं गूढ असणं कधीही छान असतं नाही का? प्रामाणिकपणे सांगायचं तर माझ्या आयुष्याबद्दल कितीपत बोलायचं हे मी अद्याप ठरवलेलं नाही. यापूर्वी मी जेव्हा माझ्या रिलेशनशीपबद्दल बोलले होते आणि त्याचा काय परिणाम झाला त्या अनुभवावरुन या निर्णयापर्यंत पोहोचले आहे.," असे इलियाना म्हणाली.

इलियाना डिक्रुझने सांगितले की, तिच्या खाजगी आयुष्यातील काही पैलू लपविण्याचा तिचा निर्णय भूतकाळातील काही कटू अनुभवांमुळे आहे. "तेव्हा काही लोक त्याबद्दल कसे बोलले ते मला आवडले नव्हते. मी माझ्याबद्दल सांगितलेल्या गोष्टी हाताळू शकते, परंतु लोक माझ्या जोडीदाराबद्दल किंवा माझ्या कुटुंबाबद्दल बकवास बोलायला लागतात तेव्हा ते मला आवडत नाही," असे इलियाना म्हणाली.

इलियाना आणि कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेल यांच्यात प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या अफवाही काही काळ पसरल्या होत्या. ते दोघे विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्यासमवेत मालदीवमध्ये एकत्र रोमँटिक सुट्टी घालवताना दिसले होते. मायकेलसोबतच्या नातेसंबंधापूर्वी, इलियाना छायाचित्रकार अँड्र्यू नीबोनसोबत दीर्घकालीन रिलेशनशीपमध्ये होती. 2019 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले होते.

हेही वाचा -

  1. करीनासह सैफ स्वित्सर्लँडमधून परतला, छोट्या जेहनं वेधलं लक्ष
  2. मेहनतीच्या जोरावर दीपिका पदुकोणनं गाठलं यशाचं शिखर
  3. जान्हवीनेही सांगितला तिच्या मॉर्फ केलेल्या फोटोचा किस्सा, रश्मिका मंदान्नाचेही केले कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.