ETV Bharat / entertainment

नेहा कक्करने फाल्गुनी पाठकच्या ओ सजना गाण्याचे केले रिक्रियशन, दांडिया क्वीन नाराज

author img

By

Published : Sep 24, 2022, 12:03 PM IST

फाल्गुनी पाठकने गाजवलेला ओ सजना या 90 च्या दशकाच्या उत्तरार्धातील लोकप्रिय गाणे ओ सजना गाण्याचे नेहा कक्करने रिक्रिएशन केले आहे. मात्र याबद्दल फाल्गुनीने नाराजी व्यक्त केली, त्यानंतर चाहत्यांनेही नेहा कक्करच्या या गाण्यावर टीका करायला सुरुवात केली आहे.

नेहा कक्कर आणि फाल्गुनी पाठक
नेहा कक्कर आणि फाल्गुनी पाठक

मुंबई - गायिका फाल्गुनी पाठक ( Falguni Pathak ) नेहा कक्करच्या ( Neha Kakkar ) ओ सजना ( O Sajna ) या आयकॉनिक गाण्याच्या रिक्रिएशनवर खूश नसल्याचे दिसते. अनेक चाहत्यांनी नेहावर मूळ गाणे 'खराब' केल्याबद्दल टीका केली आहे. ओ सजना गाणे नेहाने रिक्रिएट केल्याबद्दल फाल्गुनीनेही नाराजी दाखवल्यानंतर चाहत्यांची टीका वाढली आहे.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया
चाहत्यांच्या प्रतिक्रिया

90 च्या दशकातील हिट गाण्यामागील मूळ गायिका फाल्गुनीने इन्स्टाग्राम स्टोरीवर चाहत्यांच्या पोस्ट पुन्हा शेअर केल्या. अप्रत्यक्षपणे नेहाच्या ओ सजना गाण्याचा आवृत्तीबद्दल तिने नापसंती दर्शवली. "कुठपर्यंत जाऊ शकशील नेहा कक्कर? आमच्यासाठी आमचे जुने क्लासिक्स खराब करणे थांबवा. फाल्गुनी पाठक ही ओजी आहे.," फाल्गुनीच्या इंस्टाग्राम स्टोरीवरील एका पोस्टमध्ये असे एका चाहत्याने लिहिले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

मूळ गाणे 1999 मध्ये रिलीज झाले होते आणि त्यात अभिनेता विवान भटेना आणि निखिला पालट होते. हे गाणे एका कॉलेज फेस्टमध्ये पपेट शो म्हणून वाजवण्यात आले होते. हे गाणे जबरदस्त हिट झाले होते. नुकतेच या गाण्याच्या नवीन आवृत्तीचे अनावरण करण्यात आले.

संगीतकार तनिष्क बागची आणि गीतकार जानी यांनी टी-सिरीजसाठी ओ सजना पुन्हा तयार केले आहे. विजय सिंग दिग्दर्शित आणि बॉस्को लेस्ली मार्टिस यांनी क्युरेट केलेला आणि विकसित केलेला, हा व्हिडिओ प्रियांक शर्माच्या 'मुलांनीच मजा का करावी?' या भोवती फिरतो आणि नेहा आणि धनश्री वर्मा यांच्यासोबत गमतीशीर क्षणांचे प्रदर्शन करतो."

ओ सजना बद्दल बोलताना नेहा आधी म्हणाली, "मी धमाकेदार गाणे आणि ओ सजना म्युझिक व्हिडीओचे चित्रीकरण केले. तरुण प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि प्रेम यामुळे काल कॉलेज इव्हेंटमध्ये टीझरला खूप प्रतिसाद मिळाला आणि मला खूप आनंद झाला! मला विश्वास आहे की लोकांना हे गाणे आवडेल."

ओ सजना हे गाणे 19 सप्टेंबर रोजी T-Series च्या YouTube चॅनलवर रिलीज करण्यात आले आणि प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत 19 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही वाचा - शाहरुख खानच्या जवानमध्ये झळकणार थलपती विजय? ऍटलीच्या पोस्टमुळे चाहत्यांची उत्कंठा शिगेला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.