ETV Bharat / entertainment

जीवाचा थरकाप उडवणाऱ्या 'वध' चित्रपटाचा नीना गुप्ता, संजय मिश्रा यांनी केला ट्रेलर लॉन्च - Sanjay Mishra Upcoming Movie Vadh Trailer

नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांनी मंगळवारी त्यांच्या आगामी थ्रिलर ड्रामा चित्रपट 'वध' च्या अधिकृत ट्रेलरचे लॉन्चिंग केले. दोन मिनिटे-चाळीस सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये संजय मिश्राची थरारक बाजू दाखवण्यात आली आहे जो केवळ एका व्यक्तीचा खूनच करत नाही तर गुन्ह्याचा माग काढण्यासाठी पिठाच्या मशीनमध्ये निर्दयीपणे मृतदेहाची विल्हेवाट लावतो.

थ्रिलर ड्रामा चित्रपट वध ट्रेलर लॉन्च
थ्रिलर ड्रामा चित्रपट वध ट्रेलर लॉन्च
author img

By

Published : Nov 23, 2022, 11:22 AM IST

मुंबई - बॉलिवूड कलाकार नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांनी मंगळवारी त्यांच्या आगामी थ्रिलर ड्रामा चित्रपट 'वध' च्या अधिकृत ट्रेलरचे लॉन्चिंग केले. इंस्टाग्रामवर नीना गुप्ता यांनी ट्रेलर शेअर केला. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, "मिश्रा परिवार की कहानी जो उतनी भी मनोहर नहीं है. #वधचा ट्रेलर बाहेर आला आहे."

राजीव बर्नवाल आणि जसपाल सिंग संधू यांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 9 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. दोन मिनिटे-चाळीस सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये संजय मिश्राची थरारक बाजू दाखवण्यात आली आहे जो केवळ एका व्यक्तीचा खूनच करत नाही तर गुन्ह्याचा माग काढण्यासाठी पिठाच्या मशीनमध्ये निर्दयीपणे मृतदेहाची विल्हेवाट लावतो.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

संजय आणि नीना यांनी ट्रेलर ऑनलाइन शेअर केल्यानंतर लगेचच, चाहत्यांनी कमेंट सेक्शन भरुन टाकले आणि फायर इमोटिकॉन्सचा वर्षाव केला. "क्या कमाल करते हो गुरुजी... गज़ब स्टोरी और बेहतरीन ट्रेलर!! आपल्याला व टीम वधला शुभेच्छा देतो," अशी एका चाहत्याने कमेंट केली. आणखी एका चाहत्याने लिहिले, "ट्रेलर मजेदार... मिश्रा जी मजेदार... फिल्म भी मजेदार होगी." "फक्त मनाला आनंद देणारा," असे एक चाहत्याने म्हटलंय.

या चित्रपटाची निर्मिती जे स्टुडिओ आणि नेक्स्ट लेव्हल प्रॉडक्शनने केली आहे. लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी निर्मित आणि प्रस्तुत केले आहे. दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'उंचाई' मधील तिच्या अभिनयासाठी नीनाचे सध्या कौतुक होत आहे, ज्यात अमिताभ बच्चन, बोमन इराणी, अनुपम खेर आणि सारिका यांच्याही भूमिका आहेत.

उंचाई ही तीन मित्रांची (अनुपम, अमिताभ बच्चन आणि बोमन इराणी) कथा आहे जे आपल्या दिवंगत मित्राची ( डॅनी डेन्झोंगपा ) इच्छा पूर्ण करण्यासाठी माउंट एव्हरेस्टवर चढतात. या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले आहे.

दुसरीकडे संजय मिश्रा, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी 'सर्कस' या कॉमेडी चित्रपटात रणवीर सिंग, पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यासोबत दिसणार आहे.

हेही वाचा - प्रियंका चोप्राने मुलगी मालती मेरीच्या चेहऱ्याबद्दलची वाढवली उत्कंठा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.