मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या 'हड्डी' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात नवाज एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षत अजय शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात 300 ट्रान्सजेंडर घेतल्या गेले आहे. चित्रपटाला वास्तविक दाखवण्यासाठी निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे. संजय साहा आणि राधिका नंदाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
ट्रान्सजेंडर्सचे आयुष्य खूप वेगळे आहे : चित्रपटाबद्दल बोलताना निर्मात्याने असे म्हटले की, 'चित्रपटात एवढ्या मोठ्या संख्येने ट्रान्सजेंडर्सना कास्ट करण्याचा निर्णय कठीण होता. पण धाडसीही होता. आम्हाला त्यांना चित्रपटात घेण्यास राजी करणे फारसे अवघड नव्हते. यादरम्यान आम्ही त्यांच्या जीवनातील अनुभवांमधून शिकत होतो. आम्ही त्यांना चित्रपटाचा एक भाग बनवत होतो. आम्हाला अनेक गोष्टी यादरम्यान शिकायला मिळाल्या. त्यांचे जीवन आणि जग आपल्यापेक्षा खूप वेगळे आहे. ' रेणुका नावाची एक ट्रान्सजेंडर महिला होती जिने चित्रपटाच्या संशोधनादरम्यान चित्रपट आम्हाला मदत केली .
आव्हानांना सामोरे जावे लागले : संजय साहा म्हटले, 'रेणुकाने आम्हाला त्यांचा समुदाय आणि त्यांच्या संगोपनाबद्दल, लहानपणापासून त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या आव्हानांबद्दल जाणून घेण्यात मदत केली. त्यांनी आम्हाला त्यांच्या समुदायातील अनेक लोकांशी ओळख करून दिली, ज्यामुळे आम्हाला स्क्रिप्ट लिहिण्यास आणि त्यांचे जीवन अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत झाली.
नवाजुद्दीनसाठी असे सांगितले : संजय साहाच्या म्हणण्यानुसार, नवाजुद्दीनला व्यक्तिरेखा साकारण्यात आणि त्याच्या आयुष्यातील गोष्टी अधिक खोलवर समजून घेण्यासाठी रेणूकाने तिच्या समुदायातील काही मित्रांना त्याच्याकडे आणले होते. तसेच संजय साहानेही नवाजुद्दीनचे याबद्दल कौतुक केले. ते पुढे म्हणाले, 'मला आनंद वाटतो की नवाजुद्दीनने त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवला आणि त्यांना आलेल्या अडचणी समजून घेतल्या.' टीमने दिल्लीत ट्रान्सजेंडर लोकांसोबत शूट केले. जेव्हा ट्रान्सजेंडर प्रतिनिधित्वाचा प्रश्न येतो तेव्हा हड्डीला अधिक प्रामाणिक बनविण्यात मदत केल्याबद्दल मी रेणुका याचे श्रेय दिले आहे. याशिवाय 'रेणुकाने आम्हाला संपूर्ण वैद्यकीय प्रक्रियेत मदत केली आहे, ज्यामध्ये ऑपरेशन कसे होते आणि ऑपरेशननंतर त्यांना काय करावे लागते. ते कुठे राहतात, त्यांच्यावर उपचार कुठे होतात याची योग्य माहिती घेण्यासाठी लेखक ट्रान्सजेंडर लोकांसोबत बसले होते. आणि ते दैनंदिन जीवनात काय करतात आणि त्यांच्या जीवनशैलीचे अनुसरण केले ज्यामुळे नवाज ट्रान्सजेंडरची भूमिका करत असल्याने हद्दी हा सत्यावर आधारित चित्रपट बनवण्यात आम्हाला खूप मदत झाली.' असे त्यांनी सांगतिले.
हेही वाचा :