ETV Bharat / entertainment

Ananya Chatterjee trolled : ऑस्कर विजेत्या नाटू नाटूवर टीका केल्याबद्दल अनन्या चॅटर्जी ट्रोल

author img

By

Published : Mar 15, 2023, 5:43 PM IST

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री अनन्या चॅटर्जी हिने पुरस्कार विजेते गीत नाटू नाटू या गाण्यावर टीका करणारी पोस्ट शेअर केल्याने तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

अनन्या चॅटर्जी ट्रोल
अनन्या चॅटर्जी ट्रोल

मुंबई - आरआरआर चित्रपटातील सर्वात लोकप्रिय गाणे नाटू नाटू या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर जिंकून इतिहास रचला आहे. नाटू नाटूच्या ऑस्कर जिंकण्याचा आनंद देशभरात साजरा केला जात आहे. तथापि, हे गाणे खरोखर ऑस्करला पात्र आहे का असे म्हणत 95 व्या अकादमी पुरस्कार समितीच्या निर्णयावर काही लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

फेसबुकवर राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री अनन्या चॅटर्जीने एका पोस्टमध्ये विचारले की तिला नाटू नाटूच्या यशाबद्दल अभिमान वाटेल का? तिने लिहिले, 'मला समजत नाही, 'नाटू नातू'बद्दल मला अभिमान वाटायला हवा का? आपण कुठे चाललो आहोत? सगळे शांत का आहेत? आमच्या प्रदर्शनात हे सर्वोत्तम आहे का?????? हे सर्व संताप वाढवणारे आहे! !!!'

तिच्या या पोस्टनंतर युजर्सनी तिच्यावर कमेंट्सचा भडीमार केला आणि तिला ट्रोल केले. एका युजरने कमेंट केली, 'पण मला तुमची मत्सर आणि प्रसिद्धी मिळवण्याचा तुमचा मार्ग समजला आहे... या कमेंटपूर्वी मी तुम्हाला कधीच ओळखत नव्हतो.. पण तुम्ही कोण आहात हे मला अजूनही माहित नाही आणि मला नकोही आहे..'

दुसर्‍याने कमेंटमध्ये लिहिलंय, 'टीका करणे थांबवा आणि कृपया चांगले चित्रपट बनवा. तुमच्या उद्योगातील 65% पेक्षा जास्त सहकारी राजकारणात सामील झाले आहेत, त्यापैकी 25% वर मनी लाँड्रिंग आणि इतर आरोप आहेत. एखाद्या गाण्यावर किंवा एखाद्या कृतीवर टीका करण्यापूर्वी जे साध्य झाले आहे त्याचा विचार करा. जागतिक स्तरावर काहीतरी करामत होईल अशी बंगाली मूव्ही इंडस्ट्रीमध्ये काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करा.'

दरम्यान, नाटू नाटूने ख्यातनाम आंतरराष्ट्रीय गायिका लेडी गागा आणि रिहाना सारख्या सुप्रसिद्ध कलाकारांना मागे टाकत पुरस्कार जिंकला आहे. गीतकार चंद्रबोस आणि संगीतकार एमएम कीरावानी यांनी टीमच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला. अभिनेते ज्युनियर एनटीआर आणि राम चरण, दिग्दर्शक एसएस राजामौली, गायक राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव आणि संगीतकार ही सर्व टीम भव्य कार्यक्रमात उपस्थित होती.

हेही वाचा - Jr Ntr On Natu Natu Oscar :'कीरावानी आणि चंद्रबोसने ऑस्कर स्वीकारला हा माझा सर्वोत्तम क्षण होता'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.