ETV Bharat / entertainment

Naseeb Se Song Out: कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर 'सत्यप्रेम की कथा' मधील 'नसीब से' गाणे रिलीज - कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर 'सत्यप्रेम की कथा' मधील 'नसीब से' हे पहिले गाणे रिलीज झाले आहे. हा चित्रपट २९ जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Kartik Kiara
कार्तिक आणि कियारा
author img

By

Published : May 27, 2023, 3:57 PM IST

मुंबई : साजिद नाडियाडवालाच्या नमह पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार होत असलेला 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी स्टारर चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेल्या गाण्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याचे पहिले रोमँटिक गाणे 'नसीब से' रिलीज झाल्यानंतर अनेकजण या गाण्याला ऐकत असल्याचे दिसून येत आहे. कारण युटुबवर या गाण्याला 4 तासत 51हजार लाईक मिळाल्यामुळे हे गाणे त्याच्या चाहत्यांना पसंतीला पडले आहे असे दिसून येत आहे. शिवाय रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर हे गाणे ट्रेंड करत आहे. चाहते चित्रपटाच्या आणखी झलकांची आतुरतेने वाट पाहत आहे.

पुन्हा एकदा एकत्र झळकणार कार्तिक आणि कियारा: कार्तिक आणि कियारा यांच्यातील सुंदर केमिस्ट्रीमुळे आणि काश्मीरच्या नयनरम्य लोकेशन्समुळे हे गाणे प्रशंसा मिळवत आहे. कार्तिक आणि कियाराने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर गाणे शेअर केले आहे. चाहते व्हिडिओमधील दोघांच्या उपस्थितीची तुलना ही डिडिएलजे मधील शाहरुख आणि काजोल यांच्याशी करत आहेत. अलीकडे कियाराने तिच्या सोशल मीडिया हँडलवर गाण्याच्या शूटमधील बीटीएसचे फोटो शेअर केले होते. यापुर्वी देखील कार्तिक आणि कियारासोबत 'भूल भुलैया 2'मध्ये काम केले आहे. हा चित्रपट 2022 च्या ब्लॉकबस्टर होता. आता 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाद्वारे एकादा पुन्हा दोघे एकत्र आले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

चित्रपटाचे गाणे झाले रिलीज : 'नसीब से' या गाण्यामध्ये कार्तिक आणि कियाराची ऑन-स्क्रीन ही जबरदस्त दिसत आहे . व्हिडिओमध्ये हे जोडपे मोहरीच्या शेतात रोमान्स करताना आणि एकमेकांच्या मिठीत अडकलेले दिसत आहे, तसेच गाण्याचे बोल हृदयाला स्पर्श करणारे आहेत.पायल देवने 'नसीब से' हे गाणे संगीतबद्ध केले आहे. यासोबत पायल देव आणि विशाल मिश्रा यांनी एकत्र आवाज दिला आहे. गाण्याचे बोल एएम तुराज यांनी लिहिले आहेत. 'नसीब से'चा टीझर रिलीज झाल्यानंतर हा टीझर चाहत्यांना फार पसंतीला पडला होता. आता चाहते या चित्रपटाची फार आतुरतेने वाट बघत आहे. तसेच हा चित्रपट २९ जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हेही वाचा : Cannes 2023 : अनुष्का शर्माने रेड कार्पेटवर केले पदार्पण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.