मुंबई - Munna Bhai MBBS completes 20 years : 'डंकी' दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा 'मुन्नाभाई एमबीबीएस' हा पहिला चित्रपट 19 डिसेंबर 2003ला प्रदर्शित झाला होता. दरम्यान या चित्रपटाला रिलीज होऊन 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. संजय दत्त, अर्शद वारसी आणि बोमन इराणी स्टारर हा चित्रपट अनेकांना खूप आवडला होता. 'मुन्नाभाई एमबीबीएस' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. संजय दत्तच्या कारकीर्द उंचावण्यात 'मुन्नाभाई एमबीबीएस' कॉमेडी चित्रपटाचा खूप मोठा वाटा आहे. या चित्रपटातील संजय आणि अर्शदची मुन्ना भाई-सर्किट जोडी विसरणे फार कठीण आहे. अवघ्या 10 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं 20 वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता.
संजय दत्तची पोस्ट : या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 37 कोटीचं कलेक्शन केलं होतं, जे आजच्या घडीला 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या चित्रपटात संजय दत्तनं एका समाजसेवक गुंडाची भूमिका साकारली होती. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो डॉक्टर बनतो. डॉक्टर बनण्यात सर्किट आणि त्याची गँग मुन्नाची मदत करतात. 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, संजय दत्तनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, ''दोन दशकांची जादू की झप्पी, कॉमेडी आणि भावना, 'मुन्नाभाई एमबीबीएस'ला 20 वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव आणि एक अविस्मरणीय प्रवास. याबद्दल धन्यवाद, मला आशा आहे की, 'मुन्नाभाई 3' लवकरच प्रदर्शित होईल''.
'सर्किट'नं केली पोस्ट शेअर : 'मुन्नाभाई एमबीबीएस'ला 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अर्शद वारसीनं त्याच्या इंस्टाग्रामवर लिहिलं, ''20 वर्षे, हा चित्रपट कालच रिलीज झाल्यासारखा वाटतो, मुन्ना आणि सर्किटच्या जोडीवर अपार प्रेम दाखवले त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो''. संजय दत्त आणि अर्शद वारसीच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून या दोघांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान राजकुमार हिरानी यांनी याआधी शाहरुख खानला 'मुन्नाभाई एमबीबीएस' हा चित्रपट ऑफर केला होता. मात्र व्यग्र शेड्यूलमुळं शाहरुखनं हा चित्रपट नाकारला होता. हा चित्रपट नाकारल्याबद्दल शाहरुख खानला अजूनही पश्चाताप होत आहे. आज 20 वर्षांनंतर राजकुमार हिरानीनं 'डंकी'साठी शाहरुखची निवड केली, तेव्हा किंग खान त्यांना नाही म्हणू शकला नाही. आता रुपेरी पडद्यावर 'डंकी' किती कमाल करेल हे पाहण लक्षणीय ठरेल.
हेही वाचा :