मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर तिचा ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. मृणाल ठाकूरने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. त्यानंतर ती हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये गेली. टीव्हीच्या दुनियेत चांगला ठसा उमटवल्यानंतर मृणालने चित्रपटांसाठी ऑडिशन देण्यास सुरुवात केली. प्रत्येक स्ट्रगलिंग कलाकाराप्रमाणे मृणालचा बॉलिवूडमधील प्रवास सोपा नव्हता. तिने बॉलिवूडमध्ये जाण्याचा संघर्ष हा सुरूच ठेवला, शेवटी तिला यश आले. चला तर जाणून घेवूया मृणाल ठाकूरबद्दल काही खास गोष्टी...
बॉलिवूडमध्ये कशी झाली इंडस्ट्री: बॉलीवूड इंडस्ट्रीत प्रवेश करणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. प्रत्येक कलाकार मोठ्या पडद्यावर येण्यासाठी धडपड करत असतो. मृणालचा जन्म १ ऑगस्ट १९९२ रोजी महाराष्ट्रातील नागपूर शहरात झाला. तिने आपले सुरुवातीचे शिक्षण मुंबईतून पूर्ण केले. मृणालने टीव्ही मालिका 'मुझसे कुछ कहती ये खामोशियां'मधून अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर तिला 'कुमकुम भाग्य' ही मालिका ऑफर झाली. या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहचली. या मालिकेत तिच्या पात्राचे नाव बुलबुल होते. हे पात्र खूप गाजले. त्यानंतर तिला बॉलिवूडमधील 'सुपर ३०' हा चित्रपट ऑफर झाला. या चित्रपटातील मृणालची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यानंतर अनेक बड्या दिग्दर्शकांनी मृणालवर नजर ठेवायला सुरुवात केली होती. या चित्रपटानंतर तिला जॉन अब्राहमसोबत 'बाटला हाऊस' हा चित्रपट ऑफर झाला. या चित्रपटामधील मृणालचा अभिनय चाहत्यांना खूप आवडला होता. दरम्यान ती 'तुफान' चित्रपटात फरहान अख्तरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.
या चित्रपटांमध्ये केला मृणालने अभिनय : मृणाल ठाकूर २०२०मध्ये 'घोस्ट स्टोरी' आणि शाहिद कपूरसोबत 'जर्सी'मध्ये मुख्य भूमिकेत दिसली आहे. तिचा पॅन इंडिया चित्रपट 'सीता रामम' हा प्रेक्षकांना खूप आवडला. या चित्रपटातून तिने साऊथमध्येही पदार्पण केले. नुकतीच मृणाल लस्ट स्टोरी २मध्ये दिसली आहे. या वेब स्टोरीमध्ये तिचे पात्र हे प्रेक्षकांचे मने जिंकत आहे. याशिवाय, ती 'नानी ३०'मध्ये दिसणार आहे, हा चित्रपट २०२३ च्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. पुढे ती 'मेड इन हेवनच्या सीझन २' मध्ये देखील दिसणार आहे.
हेही वाचा :