मुंबई : टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय इंडस्ट्रीतील सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. आजकाल मौनीने तिच्या कामातून ब्रेक घेतला आहे. मौनी दुबईमध्ये तिच्या वैवाहिक जीवनाचा आनंद सध्या घेत आहे. मौनी अनेकदा बॉलिवूड पार्ट्यामध्ये दिसत असते. या व्यतिरिक्त ती आता नुकतीच दिशा पठाणीच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसली होती. दरम्यान आता एक बातमी समोर येत आहे की, मौनी रॉयची तब्येत अचानक बिघडली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खुद्द मौनीने तिच्या सोशल मीडियावर ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे. मौनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
काय झाले मौनी रॉयला : पोस्ट सोबतच मौनीने कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, तिला आता खूप शांत वाटत आहे, ती गेल्या ९ दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये होती. तिने सांगितले की ती आता आता घरी परतलो आहे आणि हळूहळू ती बरी होत आहे. तिने तिच्या सर्व सहकार्यांचे आभार देखील मानले आहे. शेवटी तिने नमः शिवाय' लिहले आहे. तसेच तिने पती सूरज नांबियारबद्दल खूप खास गोष्टी या पोस्टमध्ये लिहली आहे. मौनीचा नवरा तिची चांगली काळजी घेत आहे. मौनीच्या या पोस्टवर अनेकजन कमेंट करत आहे. तिचे चाहते तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत असून काळजी घेण्यास सांगत आहे. तसेच काही चाहत्यांनी तिच्या पोस्टवर हार्ट आणि इमोजी पोस्ट करत आहे
मौनी रॉय का नाही सोशल मीडियावर सक्रिय : अतिविचारामुळे मौनीला रुग्णालयात दाखल करावे लागले ही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबद्दल आता काहीही सांगू शकत नाही. मौनी रॉय शेवटी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर फिल्म ब्रह्मास्त्रमध्ये दिसली होती. याशिवाय मौनी रॉय सोशल मीडियावर सक्रिय असायची मात्र एका महिन्याहून अधिक काळ तिची कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर दिसली नाही. मात्र आता पुन्हा एकदा मौनी सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे.
हेही वाचा :