ETV Bharat / entertainment

Monsoon love: मलायका आणि अर्जुन कपूरची रोमँटिक मान्सुन मुडमध्ये डिनर डेट - मलायका अरोरा

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर अनेकवेळा वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट होत असतात. काल शुक्रवारी ही जोडी मुंबईतील रेस्टॉरंटमधून रोमँटिक मुडमध्ये बाहेर पडताना दिसली.

Monsoon love
मलायका आणि अर्जुन कपूर
author img

By

Published : Jul 8, 2023, 3:25 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे मनोरंजनसृष्टीतील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहेत. दीर्घ काळापासून रिलेशनशिपमध्ये असलेली ही जोडी अनेकदा भाव खाऊन जात असते. अनेकवेळा ते वेगवेगळ्या स्थावर एकत्र दिसतात. त्यांचे लेटेस्ट डिनर डेटदेखील याच पठडीतील होती.

शुक्रवारी रात्री हे लव्हबर्ड्स हातात हात घालून मुंबईतील रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले. हवेतील गारवा, पावसाची रिमझीम आणि रोमँटिक मान्सुनचा आनंद घेत त्यांची हे डिनर डेट पार पडली. मुंबईच्या पावसाची सैर करत ते घराबाहेर पडले होते.

इंस्टाग्रामवर पापाराझीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मलायका काळ्या ब्लेझरखाली पांढरा शर्ट घालून निळ्या पँटसोबत मॅचींग करताना दिसते. शकते. तिचे केस नीटनेटक्या बनमध्ये बांधले होते. ती नेहमीसारखीच जबरदस्त दिसत होती हे वेगळे सांगायची गरजच नाही. या डिनर डेटदरम्यान अर्जुन निळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसला. काळ्या कार्गोसह तो सनग्लासेसमध्ये भारदस्त दिसत होता.

व्हिडिओ शेअर होताच, सोशल मीडिया युजर्सनी त्वरित प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये त्यांच्यातील बाँडिंग, प्रेम याची दखल युजर्सनी घेतली आहे. असंख्या चाहत्यांनी भरभरुन प्रेम व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे प्रेम प्रकरण एखाद्या फिल्मी कथेहून वेगळे नाही. दोघेही मनोरंजन इंस्ट्रीमधील नावाजलेले सेलेब्रिटी स्टार आहेत. मलायकाचा घटस्फोट झाल्यानंतर दोघांच्या प्रेमाच्या बातम्या ऐकू येत होत्या. सुरुवातीला त्यांनी यावर भाष्य करणे टाळले, परंतु काही दिवस ते नेहमी एकत्र दिसल्यानंतर अखेरीस प्रेमाची कबुली त्यांनी दिली. बऱ्याच काळापासून सुरू असलेला त्यांचा रोमान्स लग्नाच्या बोहल्यापर्यंत कधी जाणार याची प्रतीक्षा त्यांचे चाहते करत आहेत.

दरम्यान, वर्कफ्रंटवर मलायका अरोरा शेवटची तेरा की ख्याल या म्युझिक व्हिडिओमध्ये गुरु रंधावासोबत दिसली होती. दुसरीकडे अर्जुनकडे अजय बहलचा 'द लेडीकिलर' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्याच्या हातामध्ये भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंग यांच्या सह अद्याप शीर्षक न ठरलेला रोमँटिक कॉमेडी चित्रपटदेखील आहे.

हेही वाचा -

१. Adipurush Dialogue Writer : आदिपुरुष संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली

२. Salaar Part 1 Ceasefire : प्रभास स्टारर सलार पार्ट १च्या टीझरने रचला इतिहास, भव्य ट्रेलरचे निर्मात्यांनी दिले वचन

३. Chandu Champion : कार्तिक आर्यनच्या स्पोर्ट्स ड्रामा 'चंदू चॅम्पियन'मध्ये श्रद्धा कपूरची एन्ट्री...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.