ETV Bharat / entertainment

Miss World In Kashmir : मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलावस्काने दिली नंदनवनाला भेट, पहा व्हिडिओ - कॅरोलिना बिलावास्का काश्मीरला भेट

मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलावस्का सोमवारी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काश्मीरला आली होती. त्यावेळी श्रीनगर विमानतळावर तिचे भव्य स्वागत करण्यात आलं. तिच्यासोबत इतर अनेक परदेशी पाहुणेही काश्मीर दौऱ्यावर आले होते. (Miss World Karolina Bielawska).

Miss World In Kashmir
मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलावस्का
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 11:26 AM IST

मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलावस्काने दिली काश्मीरला भेट

श्रीनगर : मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलावस्का हिने सोमवारी (२८ ऑगस्ट) काश्मीरला भेट दिली. एखाद्या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेच्या विजेतीनं काश्मीरला भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती. बिलावस्का एका कार्यक्रमानिमित्त एक दिवसीय श्रीनगर दौऱ्यावर आली होती.

श्रीनगर विमानतळावर भव्य स्वागत : यावेळी कॅरोलिना बिलावस्का हिचं श्रीनगर विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आलं. तिच्यासोबत मिस वर्ल्ड इंडिया सिनी शेट्टी, मिस वर्ल्ड अमेरिका श्री सैनी आणि मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या चेअरपर्सन आणि सीईओ ज्युलिया मोर्ले उपस्थित होत्या. हा कार्यक्रम PME एंटरटेनमेंट आणि भारतातील जम्मू - काश्मीर टुरिझमचे अध्यक्ष जमील सैदी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला गेला. या वर्षाच्या शेवटी भारतात मिस वर्ल्ड स्पर्धेच्या ७१ व्या आवृत्तीचं आयोजन होणाराय. त्या पार्श्वभूमीवर बिलावस्काची ही भेट आहे.

मिस वर्ल्ड स्पर्धेचा कार्यक्रमपूर्व दौरा : भारताने यापूर्वी सहा वेळा मिस वर्ल्डचा किताब जिंकलाय. भारत जवळपास तीन दशकांनंतर या स्पर्धेचं आयोजन करतोय. भारतात शेवटची मिस वर्ल्ड स्पर्धा १९९६ मध्ये आयोजित करण्यात आली होती. 'मिस वर्ल्ड स्पर्धेचा हा कार्यक्रमपूर्व दौरा देशात झालेल्या जी २० टुरिझम वर्किंग ग्रुपच्या बैठकीनंतर होत आहे', असं जम्मू आणि काश्मीर प्रशासनाचे पर्यटन सचिव सय्यद आबिद रशीद शाह यांनी सांगितलं.

भारतात रेकॉर्डब्रेक पर्यटक येण्याची अपेक्षा : 'मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलावस्का आणि मिस वर्ल्डच्या अध्यक्षा, सीईओ ज्युलिया एरिक मोर्ले यांची ही जम्मू - काश्मीर भेट सौंदर्य, कलात्मक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण करण्याची संधी देईल', असं सय्यद आबिद रशीद शाह यांनी नमूद केलं. 'ही भेट जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटन क्षेत्रातील परिवर्तनाचे सूचक आहे. भविष्यात भारतात रेकॉर्डब्रेक पर्यटक येण्याची अपेक्षा आहे. सध्या देशातील परदेशी पर्यटकांची संख्या गेल्या ३३ वर्षांतील विक्रमी उच्चांकावर आहे. मिस वर्ल्ड प्री-इव्हेंट टूरसह, जगभरातील पर्यटक जम्मू आणि काश्मीरच्या सौंदर्याचा अनुभव घेतील', असं शाह यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. Jawan trailer date locked: शाहरुखने शेअर केली 'रमैय्या वस्तावैय्या' गाण्याची झलक, 'रक्षा बंधना'ला होणार मोठा धमाका
  2. N T Rama Rao coin : प्रसिद्ध तेलुगु अभिनेते एन टी रामाराव यांच्या स्मरणार्थ राष्ट्रपतींनी जारी केलं नाणं
  3. Subhedar first week end BO : 'सुभेदार' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर पहिल्या आठवड्यात दमदार कमाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.