ETV Bharat / entertainment

'छपाक'च्या अपयशासाठी मेघना गुलजारनं दीपिका पदुकोणला धरलं जबाबदार - मेघना गुलजार

Meghna Gulzar on Deepika Padukone : दिग्दर्शिका मेघना गुलजारचा 'सॅम बहादूर' हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती व्यग्र आहे. एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये तिनं 'छपाक' चित्रपटाच्या अपयशाबाबत खुलासा केला आहे.

Meghna Gulzar on Deepika Padukone
दीपिका पदुकोण आणि मेघना गुलजार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 5:34 PM IST

मुंबई - Meghna Gulzar on Deepika Padukone : 'राझी' आणि 'तलवार' यांसारख्या चित्रपटांनी नाव कमावलेली दिग्दर्शिका मेघना गुलजार या तिच्या आगामी चित्रपट 'सॅम बहादूर'मुळं चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट 1 डिसेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. 'सॅम बहादूर' या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत विकी कौशल दिसणार आहे. आता या चित्रपटाचं प्रमोशन जोरात सुरू आहे. एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये मेघनाला तिच्या 'छपाक' चित्रपटाच्या अपयशाबद्दल विचारण्यात आलं होतं. दीपिका पदुकोणच्या जेएनयू भेटीमुळं चित्रपटावर परिणाम झाला का असा सवाल तिला विचारण्यात आला होता. 'छपाक'च्या अपयशाबद्दल खुलासा करत तिनं म्हटलं की, ''मला खात्री आहे की याचं उत्तर अगदी स्पष्ट होय असंच आहे. नक्कीच, त्याचा चित्रपटावर परिणाम झाला, हे नाकारता येणार नाही."

'छपाक' चित्रपटादरम्यान दीपिकानं दिली जेएनयूला भेट : जानेवारी 2020 मध्ये दीपिका पदुकोणची जेएनयू भेट खूप वादग्रस्त ठरली होती. 'छपाक' या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान ती जेएनयू कॅम्पसमधील महाविद्यालयात गेली होती. त्यानंतर रस्त्यावर आणि सोशल मीडियावर 'छपाक' या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली. हा चित्रपट यावेळी प्रदर्शित होणार होता. आता या चित्रपटाची दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी याबाबत चर्चा केली आहे. 2020 च्या सुरुवातीस, जेएनयूमध्ये एक खळबळ उडाली होती. मुखवटा घातलेल्या बदमाशांनं कॅम्पसमध्ये घुसखोरी करून वसतिगृहात विद्यार्थ्यांवर लाठ्या आणि रॉडने हल्ला केला होता. त्यानंतर या महाविद्यालामधील वातावरण पेटले होते. जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर कॅम्पसमध्ये 'देशविरोधी घोषणा' दिल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. या वादाला मोठं वळण मिळालं होतं. जेएनयूमध्ये जाण्यापूर्वी दीपिका पदुकोण एका मुलाखतीत जेएनयू कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराबद्दल बोलली होती.

'छपाक' चित्रपट : 'छपाक' हा चित्रपट अ‍ॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या मुलीच्या कहाणीवर आधारित होता. या चित्रपटामध्ये दीपिका मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाला रुपेरी पडद्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. परंतु, बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. यावर्षी दीपिकानं 'पठाण' आणि 'जवान' या दोन बॅक टू बॅक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. या दोन्हीही चित्रपटांनी जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींहून अधिक कमाई केली. तिचा आगामी चित्रपट 'फायटर' हा हृतिक रोशनसोबत येणार आहे. मेघना गुलजारचा आगामी चित्रपट 'सॅम बहादूर' फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे.

हेही वाचा :

  1. लग्नाआधी रणदीप हुडा आणि गर्लफ्रेंडसह घेतलं इम्फाळ येथील मंदिरात दर्शन
  2. राजामौलीनं राम गोपला वर्माची केली संदीप रेड्डी वंगाशी तुलना, रामूनं शेअर केली क्लिप
  3. डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आलिया भट्टनं महिलांना केलं जागृत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.