मुंबई - न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'सिर्फ एक बंदा काफी है' च्या स्क्रीनिंगनंतर, मनोज बाजपेयीने कोर्टरूम ड्रामा 'सहारा तू मेरा' मधील त्याच्या नवीन गाण्याची एक झलक शेअर केली आहे. या गाण्याला संगीत सिद्धार्थ हल्दीपूर दिले असून असीस कौर हे गाणे गायले आहे. गाण्याचे बोल असे आहेत, 'गरीमा अब्राह के हैं' या चित्रपटामध्ये मनोज बाजपेयीने वकिलाची भूमिका साकरली आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर तुरुंगात असलेल्या आसाराम बापूला बलात्काराच्या आरोपाखाली कायदेशीर नोटीस पाठविण्यात आहे. त्यानंतर मनोज यांनी सोशल मीडियावर ट्विट केले, 'जेव्हा हा हॅशटॅग तुमच्यासोबत असेल, तेव्हा कोणतीही भीती नसते, तुमच्यासोबत अन्याय होणार नाही', असे त्यांनी लिहले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
मनोज बाजपेयी झळकणार वकिलाच्या भूमिकेत : 'सहरा तू मेरा'चा टीझर आता 23 मे रोजी 'हॅशटॅग 'जी5' आणि हॅशटॅग 'जी5ग्लोबल', 'सिर्फएकबंदाकाफीहै' हॅशटॅग सोशल मीडियावर झळकत आहे. या चित्रपटाचे 23 मे रोजी जी5, जी5ग्लोबल वर प्रीमियर होईल. तसेच या चित्रपटाचे गाणे बुधवारी प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी, निर्मात्यांनी शीर्षक ट्रॅक सामायिक केले होते. या चित्रपटाची सोशल मीडियावर फार चर्चा सध्याला सुरू आहे. या चित्रपटाची कथा एका सामान्य व्यक्तीबद्दलीची आहे. या चित्रपटामध्ये असा संदेश दिला आहे की, सामान्य माणसाची इच्छाशक्ती आणि स्वयंभू संताची शक्तीच्या लढाईत कधी पण पहिल्यावाल्याचा नेहमीच विजय होतो, कारण कोणताही माणूस कायद्याच्या वर नाही, असे या चित्रपटात दाखविले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अपूर्व सिंग कार्की दिग्दर्शित चित्रपट हा लवकरच होणार प्रदर्शित : अपूर्व सिंग कार्की दिग्दर्शित हा चित्रपट 23 मे रोजी जी5 वर प्रीमियर होण्यास सज्ज आहे. मनोज बाजपेयीला इंडस्ट्रीत त्याच्या गंभीर भूमिकांसाठी ओळखले जाते. या अभिनेताचा चाहता वर्ग फार मोठा आहे. चाहत्यांना त्याचा अभिनय फार आवडतो. त्यामुळे या चित्रपटाला बघण्यासाठी अनेकजण फार आतुर असणार हे नक्की. कारण यापुर्वी देखील ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या चित्रपटाद्वारे बाजपेयीने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या नजरेत आपली एक वेगळी छाप पाडली आहे. या चित्रपटने त्यावेळी अक्षरश: धुमाकूळ घालतला होता. या चित्रपटाचे गाणे देखील फार हिट झाले होते. आता यावेळी बाजपेयी आपल्या अभिनयाचा जादू दाखवायला पुन्हा एका 'सिर्फ एक बंदा काफी है' या चित्रपटाद्वारा प्रेक्षकांना भेटायला येत आहे. या चित्रपटाला चाहते भरभरून प्रेम करतील अशी अपेक्षा त्याला आहे.
हेही वाचा : Gauhar Khan became a mother : गौहर खानने दिली गुड न्यूज, घरी नव्या पाहुण्याचे आगमन!