ETV Bharat / entertainment

Manoj Bajpayee on Sushant Singh : शुद्ध मनाच्या सुशांत सिंगला फिल्म इंडस्ट्रीतील हेराफेरी कळली नाही

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत उत्तम संबंध शेअर केलेले मनोज बाजपेयी म्हणाले की तरुण सुशांत फिल्म इंडस्ट्रीतील राजकारण हाताळू शकला नाही. सुशांतला काय त्रास होत आहे याची जाणीव मनोज यांना होती मात्र तो आत्महत्येसारखे कठोर पाऊल उचलेल असे त्याला वाटले नव्हते.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : May 22, 2023, 3:27 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये घराणेशाहीतून प्रस्थापित झालेले आणि कोणतीही चित्रपट व्यवसायाची पार्श्वभूमी नसलेले अशा दोन प्रकारचे लोक कार्यरत आहेत. अशा बाहेरुन आलेल्या प्रस्थापित कलाकारांमध्ये प्रतिभाशाली अभिनेता मनोज बाजपेयींचा समावेश होतो. अनेक राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मनेज बाजपेयींचा चित्रपटसृष्टीतील प्रवास सोपा नव्हता पण तो खडतर कष्टातून या ठिकाणी संघर्ष करत राहिला. मनोज बाजपेयीला वाटते की त्याचा सोनचिरडिया चित्रपटातील सहकलाकार सुशांत सिंग राजपूत चित्रपट उद्योगातील राजकारण हाताळू शकला नाही.

अभिषेक चौबे दिग्दर्शित 2019 च्या सोनचिडिया चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुशांतच्या निधनाचा वैयक्तिकरित्या त्याच्यावर कसा परिणाम झाला याबद्दल मनोजने अलीकडील मुलाखतीत खुलासा केला आहे. मनोजने सांगितले की सुशांत सिंगने त्याला कराव्या संकटांच्या लागणाऱ्या सामन्यांबद्दल त्याच्याकडे खुलासा केला होता, पण तो असे काही कठोर पाऊले उचलेल असे त्याला वाटले नव्हते.

मनोज बाजपेयी म्हणाला की, सुशांतने त्यांच्याशी इंडस्ट्रीतील राजकारण आणि पक्षपातीपणाचा त्याच्यावर कसा परिणाम होतो याबद्दल सांगितले होते. फिल्म इंडस्ट्रीत राजकायरण नेहमी चालते, परंतु यशाच्या पायऱ्यावरुन वर जाताना ते अधिक घाण होत जाते. माझ्यात जिद्द आणि जाड त्वचा असल्यामुळे मला कधीच अडचण आली नाही. तो मात्र दबाव हाताळू शकला नाही. तो माझ्याशी बोलला होता. या गोष्टींबद्दल काळजी करण्याचा त्याच्यावर परिणाम झाला.

सुशांत नेपोटिझमचा बळी होता का? या प्रश्नावर बोलताना मनोज बाजपेयींनी नकार दिला. त्यांनी सांगितले की, सुशांतला स्टार व्हायचे होते परंतु सिस्टम कसे कार्य करते हे तो समजू शकला नाही. तुम्हाला मनोज बाजपेयी व्हायचे असेल तर तिथे राजकारण नसते. पण त्याला स्टार व्हायचे होते आणि तिथे खूप स्पर्धा होती. स्टार बनण्यासाठी जो कोणी मैदानात उतरेल तो ते स्थान मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. मात्र, त्याला ते सहन होत नव्हते. माझ्या लक्षात आले आहे की तो एक शुद्ध मनाचा होता आणि आतून एका मुलासारखा होता. त्याला आवश्यक असलेली हेराफेरी समजू शकली नाही.

2020 मध्ये, सुशांतच्या निधनाने हिंदी चित्रपट उद्योगात घराणेशाहीच्या चर्चेला उधाण आले होते. काही लोकांच्या वयैक्तिक महत्त्वकांक्षेने यामध्ये तेल ओतण्याचा प्रयत्न केला. 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत त्याच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. एसएसआर मृत्यू प्रकरणाची मुंबई पोलिसांनी सुरुवातीला चौकशी केली होती परंतु नंतर तो तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आला होता, ज्याचा अद्याप निष्कर्ष निघणे बाकी आहे.

हेही वाचा - Tamannaah Bhatia Breaks Silence : अनिल रविपुडीसोबतच्या वादावर तमन्ना भाटियाने मौन तोडले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.