ETV Bharat / entertainment

मनोज बाजपेयीने सादर केलेली ''भगवान और खुदा'' कविता व्हायरल - मनोज बाजपेयी भगवान और खुदा

भगवान और खुदा नावाची मनोज बाजपेयीने 2020 मध्ये सादर केलेली कविता, पुन्हा एकदा सोशल मीडिया युजर्सनी शोधून काढली आहे. जातीय सलोखा वाढवण्याचा संदेश या कवितेतून पाहायला मिळतो.

मनोज बाजपेयी
मनोज बाजपेयी
author img

By

Published : Apr 23, 2022, 10:35 AM IST

मुंबई - 2020 मध्ये मनोज बाजपेयीने सादर केलेल्या जातीय सलोख्याचा संदेश देणाऱ्या कवितेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ही संकल्पना आणि कविता ज्यांनी लिहिली होती ते चित्रपट निर्माते मिलाप झवेरी यांनी ही कविता सध्याच्या काळातील लोकापर्यंत पोहोचल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

भगवान और खुदा या दोन मिनिटांच्या या कवितेमध्ये धर्मांमधील संघर्षाच्या अकार्यक्षमतेला संबोधित करण्यात आले आहे. कविता सादर करताना बाजपेयी म्हणतात, "भगवान और खुदा आपस में बात कर रहे थे, मंदिर और मस्जीद के बीच चौराहे पर मुलाकात कर रहे हैं थे, की हात जोडे हुए हो या दुआ मे उठे, कोई फरक नही पडता है.''

कोरोना व्हारयरने जेव्हा भारतात सर्वाधिक कहर केला होता त्याकाळात २०२० मध्ये मिलाप झवेरी यांनी ही कविता केली होती. पण ज्या वेळी मध्य प्रदेश, गुजरात आणि राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली सारख्या राज्यांमध्ये जातीय घटना घडल्या त्या वेळी ही कविता पुन्हा एकदा सोशल मीडिया युजर्सनी शोधली व त्यातून शांतता आणि सौहार्दाच्या संदेशाची प्रशंसा केली गेली.

मनोज बाजपेयी याचा आज ५३ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने सोशल मीडियामध्ये त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा - अमृता खानविलकरच्या अदांवर प्रेक्षक फिदा, ‘चंद्रमुखी'मधील 'बाई गं' लावणीला कोटीहून अधिक व्ह्यूव्ज !!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.