मुंबई - दिग्दर्शक इंद्र कुमार दिग्दर्शित थँक गॉड चित्रपटातील पहिले गाणे 'मनिके' शुक्रवारी (16 सप्टेंबर) रिलीज झाले आहे. या गाण्यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि नोरा फतेही यांच्यात रोमान्स पाहायला मिळत आहे. 'मनिके' हे गाणे श्रीलंकन गायिका योहानी यांच्या 'मानिक मागे हिदे' या लोकप्रिय गाण्याची हिंदी आवृत्ती आहे.
योहानी यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. त्याचबरोबर गाण्यांमध्ये सिद्धार्थ आणि नोरा यांची जोडी खूपच छान दिसत आहे. या गाण्यात सिद्धार्थ स्वर्गीय जगातील अप्सरांच्या मध्यभागी आहे, जिथे स्वर्गाची नायिका बनलेली नोरा त्याला आकर्षित करत आहे. सिद्धार्थ नोराची केमिस्ट्री चांगली दिसत असून गाण्याच्या मध्यभागी अजय देवगणची नजर सिद्धार्थवर खिळली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'थँक गॉड' चित्रपट वादात - अजय देवगण चित्रपटात चित्रगुप्ताची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांवर चित्रगुप्ताची व्यक्तिरेखा चित्रपटातून नीट सादर न केल्याचा आरोप आहे. या विरोधात अनेक राज्यांतून आवाज उठवला गेला आहे.
'थँक गॉड' हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा कार अपघातात मरत नाही किंवा तो वाचलेलाही नाही. जेव्हा त्याचे डोळे उघडतात तेव्हा तो चित्रगुप्ता समोर असतो आणि आपण इथे कसे पोहोचलो याचे कारण विचारतो. चित्रगुप्तची भूमिका अजय देवगणने साकारली आहे.
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, तो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. भरपूर कॉमेडी असलेल्या या ट्रेलरमध्ये अजय ते सिद्धार्थ आणि रकुल प्रीत सिंग यांनीही चांगले काम केले आहे.
हेही वाचा - जॅकलीन आणि नोरा फतेहीसह तीन मॉडेल अभिनेंत्रींवर सुकेश चंद्रशेखरची दौलतजादा