मुंबई - Mandali Censor Board : 'मंडली'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरला चित्रपटगृहात आणि प्रसारण चॅनेलवर चालवण्यास मान्यता न दिल्याबद्दल सेन्सॉर बोर्डाची निंदा केली आहे. या चित्रपटाला यूए ( U/A) प्रमाणपत्र मिळविण्यात सतत विलंब झाला आहे. यामुळे मार्केटिंगच्या दृष्टीनं या चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठे नुकसान झाले आहे. हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर फक्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. यामुळे या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांपर्यंत कमी पोहोचला आहे. राकेश चतुर्वेदी ओम दिग्दर्शित, 'मंडली' चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.
सेन्सॉर बोर्डावर झाली टीका : सेन्सॉर बोर्डानं चित्रपटाच्या ट्रेलरला मंजुरी देण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मार्केटिंगसह चित्रपटाच्या प्रमोशनावर परिणाम झाला आहे. 'मंडली' हा चित्रपट रंगमंचावर रामलीला सादर करणाऱ्या कलाकारांच्या जीवनावर आधारित आहे. हा रामलीला विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटाचे प्रमोशन नवरात्रीचा काळात सर्वोत्तम होऊ शकते असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. नवरात्रीमध्येचं या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर या चित्रपटाला प्रमापत्र मिळाले. मात्र अनेक प्रयत्न करूनही ट्रेलरच्या मंजुरीबाबत कोणताही प्रतिसाद आलेला नाही असं निर्मात्यांनी सांगितले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
सेन्सॉर बोर्ड करत आहे हस्तक्षेप : दिग्दर्शक राकेश चतुर्वेदी यांनी म्हटलं 'आम्ही सेन्सॉर बोर्डाकडे सर्व आवश्यक कागदपत्रे आणि नियोजित रिलीज तारखेपूर्वी म्हणजेच 15 ते 20 दिवस आधी सादर केले होते. अनेक प्रयत्न करूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. त्याच्या ऑफिसमध्ये गेल्यावर माझी निराशा होते. हा चित्रपट रिलीज होण्यास काही दिवस उरले आहेत. चित्रपटाचे प्रमोशन होत नाही हे खूपच निराशाजनक आहे. प्रोमोजच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचत आहोत, मात्र त्यात देखील सेन्सॉर बोर्ड हस्तक्षेप करत आहे.
- 'मंडली'ची स्टारकास्ट : या चित्रपटामध्ये अभिषेक दुहान, विनीत कुमार, आंचल मुंजाल, अलका अमीन, अश्वथ भट्ट, सहर्ष शुक्ला कंवलजीत सिंग, रजनीश दुग्गल, ब्रिजेंद्र काला आणि नीरज सूद कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. 'मंडली'च्या निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या कारवाईचा निषेध केला आहे. चित्रपटाला सर्टिफिकेटही मिळाले आहे, पण मार्केटिंगच्या अडथळ्यामुळे चित्रपटाचे मोठे नुकसान होत आहे.
हेही वाचा :