ETV Bharat / entertainment

मानसी स्कॉट आणि मेटास्टार मीडिया देणार संगीताची अनोखी अनुभूती - मानसी स्कॉट जूडणार चाहत्यांसोबत

Manasi Scott : संगीतप्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे. मेटाव्हर्स प्लॅटफॉर्ममार्फत संगीत प्रेमींना आता म्युझिकल ट्रीट मिळणार आहे.

Manasi Scott
मानसी स्कॉट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2023, 2:25 PM IST

Updated : Dec 9, 2023, 5:17 PM IST

मुंबई - Manasi Scott : मानसी स्कॉट आणि मेटास्टार मीडिया यांच्या ग्राउंडब्रेकिंग व्हर्च्युअल स्पेसचा प्रीमियर झाला आहे. इमर्सिव मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म हे मानसीला चाहत्यांशी आणि जगाशी कनेक्ट करून ठेवणार आहे. मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म हा डिजिटल क्षेत्रातला अभिनव प्रयोग आहे. हा प्लॅटफॉर्म चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांशी आणि त्यांच्या कलेशी जोडण्याचं काम करतो.

मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म : मानसी स्कॉटनं या प्लॅटफॉर्मबद्दल बोलताना म्हटलं, ''मला मेटास्टारसोबतचा प्रवास आवडतो. हा प्रवास माझ्या चाहत्यांशी, नवीन मार्गाने संवाद साधण्याच्या दृष्टीने अत्यंत रोमांचक असेल. लाखो चाहते डिजिटल पद्धतीनं जोडण्यासाठी आणि हा वारसा पुढे नेण्यासाठी एक नाविन्यपूर्ण आणि परस्परसंवादी व्यासपीठ आहे''. या प्लॅटफॉर्मद्वारे मानसी चाहत्यांशी संपर्कात राहिल. मानसी ही हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका आहे. तिनं अनेक पुरस्कार जिंकले आहेत. कलेचा डिजिटल तंत्रज्ञानाशी मेळ घालण्याचा अनोखा प्रयत्न मानसी करत आहे.

मानसी स्कॉटबद्दल : याशिवाय मेटास्टार मीडियाचे सह-संस्थापक, शतद्रू सरकार यांनी ते मानसी स्कॉटसोबत आर्टिस्टवर्स प्रोजेक्टवर सहयोग करण्यास अत्यंत उत्सुक असल्याचं सांगितलं. ती आपल्या ओळखीच्या सर्वात अष्टपैलू कलाकारांपैकी एक असून मेटाव्हर्स हे तिच्या कारकिर्दीतील विविध पैलू आणि संगीतापासून मार्शल आर्ट्सपर्यंत तिच्या विविध कामगिरीवर प्रकाश टाकण्यासाठी योग्य माध्यम आहे असल्याची प्रतिक्रिया दिली. मानसीनं हिंदी आणि तमिळमध्ये पार्श्वगायन केलं आहे. तिनं ओटीटी मालिकांमध्ये अभिनय करण्यापासून तर देशातील काही डिझायनर्ससाठी फॅशन आयकॉन आणि शोस्टॉपर बनण्यापर्यंतचं काम केलं आहे. मानसीला निक जोनास-प्रियांका चोप्रा यांच्या हाय-प्रोफाइल विवाह सोहळ्यात परफॉर्मन्स सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं.

हेही वाचा :

  1. न भेटताही विकी कौशलच्या प्रेमात पडली होती कतरिना कैफ, अशी सुरू झाली 'लव्ह स्टोरी'
  2. रश्मिका मंदान्नानं उलडलं 'अ‍ॅनिमल'मधील गीतांजलीचं व्यक्तीमत्व, कणखर स्त्रीत्वाचा दिला दाखला
  3. ज्युनियर एनटीआरनं नेटफ्लिक्सचे सीईओ टेड सारंडोसला जेवणासाठी केले आमंत्रित

Last Updated : Dec 9, 2023, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.