ETV Bharat / entertainment

Malaika Arora wishes mother : मलायका अरोराने आईच्या ७० व्या वाढदिवसानिमित्य दिल्या शुभेच्छा - मलायकाच्या वर्क फ्रंटबद्दल

अभिनेत्री मलायका अरोरा हिने आई जॉयस अरोरा यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला आहे. यानिमित्ताने तिने कुटुंबासोबतचा फोटोही शेअर केला. यावर बॉलिवूड सेलेब्रिटीज शुभेच्छा देत आहेत.

मलायका अरोरा
मलायका अरोरा
author img

By

Published : Mar 2, 2023, 4:16 PM IST

मुंबई - अभिनेत्री मलायका अरोरा हिने आई जॉयस अरोरा यांना तिच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त गोड संदेश देऊन शुभेच्छा दिल्या आहे. इंस्टाग्रामवर मलायकाने तिची आई आणि इतर कुटुंबातील सदस्य असलेले काही फोटो टाकले. फोटो शेअर करताना तिने लिहिले, ' मस्त वाटत आहे, मी शांत राहू शकत नाही कारण आज माझ्या आईचा वाढदिवस आहे.'

पोस्ट अपलोड होताच, मलायकाच्या चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील मित्रांनी त्यांच्या हार्दिक शुभेच्छांसह कमेंट सेक्शनमध्ये प्रेमाचे संदेश दिले आहेत. यामध्ये मलायकाची मैत्रीण दिग्दर्शक फराह खानने लिहिले, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा'. अभिनेत्री नेहा धुपियाने लिहिले, 'हॅपी बर्थडे आंटी जॉयस'. महीप कपूरने वाढदिवसाच्या शुभेच्छाही देताना लिहिले,' हॅपी बर्थडे टु गॉडेस्ट'. अभिनेता संजय कपूरने लिहिले, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा'. अभिनेता चंकी पांडेने पोस्ट केले,' हॅप्पी हॅप्पी बर्थडे डियर जॉयस'.

मलायकाची बहीण अमृता अरोरा हिनेही तिच्या आईसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. 'मदर शिप आज 70 वर्षांची आहे !!! मी तुझ्यावर प्रेम करते आई सर्व आयुष्यात तू माझी आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करते', असे तिने पोस्ट केले. मलायका आणि अमृताची जिवलग मैत्रीण करीना कपूरने जन्मदिनाच्या शुभेच्छांचा विस्तार करताना मलायकाच्या आई-वडिलांच्या फोटोसह 'हॅपी जॉयस आंटी' असे लिहिले आहे.

मलायकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर तिने अलीकडे Disney+ Hotstar सह डिजिटल पदार्पण केले आहे. मलायका 'मूव्हिंग इन विथ मलायका' या नवीन शोमध्ये अनफिल्टर्ड संभाषणातून चाहत्यांना तिच्या आयुष्यात डोकावण्यासाठी सहज प्रवेश देते.

व्हिजे ते आयटम गर्ल मलायका - एमटीव्ही इंडिया वाहिनी जेव्हा सुरू झाली तेव्हा मलायकाने व्हिजे म्हणून ईआपल्या करियरला सुरुवात केली. तिने अनेक सेलेब्रिटींच्या मुलाखती घेत त्यांना बोलते केले. तिने क्लब एमटीव्ही सारखे शो होस्ट केले. त्यानंतर सायरस ब्रोचा सोबत लव्ह लाइन आणि स्टाईल चेक या शोचे सह-होस्टिंग केले. त्यानंतर मलायका अरोराने मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला. बल्ली सागूच्या गुर नालो इश्क मीठा सारख्या अल्बम गाण्यांसाठी,जस अरोरा यांच्यासोबत आणि 1998 मधील बॉलीवूड चित्रपट दिल से मधील छैय्या छैय्या सारख्या अल्बम गाण्यांनी तिला उंदड लोकप्रियता मिळवून दिली.

मुन्नी बदनाम हुईचा विक्रम - 2010 मध्ये आलेल्या दबंग चित्रपटातील मुन्नी बदनाम हुई या आयटम सॉन्गमध्ये मलायकाने काम केले होते, ज्याची निर्मिती तिचा माजी पती अरबाज खान यांनी केली होती. इतकेच नाही तर 12 मार्च 2011 रोजी, तिने मुन्नी बदनाम वर नृत्यदिग्दर्शित करून 1235 सहभागींसह नृत्य सादर करत जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यास मदत केली, ज्याचे तिने नेतृत्व केले होते.

हेही वाचा - Salman Khan's Billi Billi Song Released : सलमान खानच्या टायगर 3 मधील बिल्ली बिल्ली गाणे रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.