मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा हिला सोमवारी (4 एप्रिल) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मलायकाच्या कारला शनिवारी सायंकाळी पनवेलजवळ अपघात झाला. अरोरा पुण्याहून मुंबईला परतत असताना संध्याकाळी 4.45 च्या सुमारास एका फूड मॉलजवळ ही घटना घडल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
बस आणि दोन कारची टक्कर झाली आणि त्यातील एक मलायकाच्या अरोराच्या एसयूव्हीला धडकली. अभिनेत्री तिच्या ड्रायव्हर आणि अंगरक्षकासोबत प्रवास करत होती. मलाइकाला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. राज ठाकरेंचा पक्ष मनसेच्या कार्यकर्त्यांनी अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल केले होते. मनसे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभेसाठी पुण्याहून मुंबईला जात होते.
चालकाचे सुटले नियंत्रण
मलायका अरोराच्या कारच्या चालकाचे पनवेलजवळ नियंत्रण सुटले. आणि तिची गाडी वाहनांना धडकली. या घटनेत मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) सरचिटणीस जयराज लांडगे यांनी मलायका अरोरा यांना त्यांच्या गाडीतून नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात नेले. उपचार करून ते मुंबईला रवाना झाले. डिस्चार्जनंतर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये मलायकाच्या डोक्यावर पट्टी बांधलेली आहे. या फोटोंवर त्याचे चाहते त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
हेही वाचा - Malaika Arora Car Accident : अभिनेत्री मलाइका अरोराच्या गाडीचा अपघात; मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले