मुंबई - बॉलिवूड सेलेब्रिटींची प्रेम प्रकरणे, एकत्र स्पॉट होणे, व्हेकेशनवर जाणे, रेस्टॉरंट्समध्ये डेटिंग करणे ही गोष्ट सामान्य झाली आहे. पूर्वी याचे खूप अप्रुप लोकांना वाटायचे. पण सोशल मीडियाचा वाढता वापर आणि पापाराझींची सेलेब्रिटींवर असलेली कायमची करडी नजर यामुळे लोकांना यात फारसे काही नवल वाटत नाही. पण जेव्हा त्यांच्या विभक्त होण्याच्या किंवा ब्रेकअपच्या बातम्या झळकतात तेव्हा मात्र भुवया उंचावल्या जातात. अशाच एका बातमीने अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या चाहत्यांच्या भुवया मोठ्या झाल्या होत्या. दोघांच्यात बिनसल्याच्या आणि ब्रेकअप झाल्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या होत्या. हा गदारोळ उठला असतानाच हे जोडपे मुंबईतील रेस्टॉरंटमधून रोमँटिक मूडमध्ये बाहेर पडताना दिसल्याने ब्रेकअपच्या बातम्यांना लगाम लागला आहे.
मलायकाने अर्जुनच्या कुटुंबातील सदस्यांना सोशल मीडियावर अन फॉलो केल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. यामध्ये म्हटले जातंय की मलायकाने अर्जुनच्या बहिणी अंशुला कपूर, जान्हवी कपूर, खुशी कपूर आणि त्याचे वडील, चित्रपट निर्माते बोनी कपूर यांना अन फॉलो करायला सुरुवात केली होती. तर सोनम कपूर, रिया कपूर, शनाया कपूर आणि संजय कपूर यांना फॉलो करणे तिने सुरुच ठेवले होते. यावरुन तर्क लावण्यात आला की अर्जुन आणि मलायाकाचा प्रवास ब्रेकअपच्या दिशेने सुरू झाला आहे.
मुंबईतील रेस्टॉरंटच्या बाहेर दिसलेल्या मलायकाने पांढरी वस्त्रे परिधान केली होती. लक्झरी हँडबॅग आणि काळ्या सनग्लासेससह तिने आपला लुक पूर्ण केला होता. दोघांनीही पापाराझींना फोटोसाठी पोझ देणे टाळले असले तरी दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता. अर्जुन आणि मलायका दोघेही एकाच कारमधून निघून गेल्यानंतरही दोघांच्या स्पॉट होण्याची चर्चा रंगली.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या प्रेम प्रकरणाची उघड चर्चा २०१९ पासून सुरू झाली. इंडियाज गॉट टॅलेंट या शो दरम्यान हे जोडपे हातात हात घालून चालताना दिसले आणि लॅक्मे फॅशन वीकमध्येही त्यांनी आपली जवळीक दाखवली. त्यानंतर या जोडप्याला अनेकदा परदेशात व्हेकेशनसाठी जाताना पाहण्यात आले. यापूर्वी हे जोडपे बर्लिन, साल्झबर्ग आणि फ्रँकफर्टला बोनी कपूरसह सुट्टीवर गेले होते. मलायाकाने पती अरबाज खानसोबत २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर अर्जुन आणि मलायकाचे सूत जुळले. अद्याप त्यांनी लग्नाबद्दलची उघड चर्चा केलेली नाही.
हेही वाचा -
१. Singer Armaan Malik And Aashna Shroff : गायक अरमान मलिकने केली एंगेजमेंटची घोषणा....