मुंबई - अभिनेत्री महिमा चौधरीने एका चित्रपट कार्यक्रमात तिच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना खूप दिवसांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील अग्रगण्य महिला क्रांतिकारक नीरा आर्य यांच्या जीवनावर आधारित नीरा आर्य या चित्रपटाच्या मोशन पोस्टर लाँच प्रसंगी त्यांनी सर्वांचे आभार मानले आणि दोन वर्षांनंतर दिवाळीची भव्यता पाहायला मिळत असल्याचे सांगितले. अभिनेत्री रूपा अय्यर, प्रियांका चौहान, प्रणव देसाई, मनीष देसाई, गौतम श्रीवत्स उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्या महिमा चौधरी यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. आरटू पेट्रियॉटिक फिल्म्स आणि रूपा अय्यर फिल्म फॅक्टरी यांच्या बॅनरखाली निर्मित हा चित्रपट वास्तविक घटनांवर आधारित असून कथेतील ट्विस्ट आणि टर्न्स आजच्या प्रेक्षकांना आवडतील. दिग्दर्शिका रूपा अय्यर श्रीवत्सच्या म्हणण्यानुसार, नीरा आर्याची कथा एका अनुभवी व्यक्तीच्या हृदयद्रावक प्रवासाभोवती फिरते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत त्यांची भूमिका मोठी होती. त्या या सेनेसाठी गुप्तहेर म्हणूनही काम करत होत्या. त्यांच्या जीवनावर बनत असलेला हा चित्रपट म्हणजे एका अक्षात पराक्रमी महिलेची कहानी आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असताना हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
हेही वाचा - सलमान खान डेंग्यमुळे आजारी, बरा होईपर्यंत करण जोहर बनला बिग बॉस १६चा होस्ट?