ETV Bharat / entertainment

Mahesh Babu Tweet : महेश बाबूनं 'एक्स'द्वारे दिलेल्या शुभेच्छांना दिला शाहरुखनं रिप्लाय... - Mahesh Babu

Mahesh Babu Tweet : साऊथ सुपरस्टार महेश बाबूनं शाहरुख खानच्या 'जवान'बद्दल उत्साह व्यक्त करत एक अभिनंदनाचं ट्विट केलं आहे. त्यानंतर किंग खाननं महेशच्या ट्विटला प्रतिसाद देत आभार मानले आहे.

Mahesh Babu Tweet
महेश बाबू ट्विट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 7:21 PM IST

मुंबई Mahesh Babu Tweet : शाहरुख खानचा जवान हा चित्रपट 7 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चाहत्यांसोबतच अनेक कलाकार शाहरुख खानच्या 'जवान'साठी खूप उत्सुक आहेत. रिलीजच्या एक दिवस आधी, अनेक सेलिब्रिटी शाहरुखला चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत. साऊथ सुपरस्टार महेश बाबूनं देखील शाहरुखचं अभिनंदन केलं आहं. महेश बाबूनं ट्विट करून 'जवान'ला पाठिंबा दिला आहे. यासोबत महेश बाबूला प्रत्युत्तर देत शाहरुखनं महेश बाबूचे आभार मानले आहेत. सध्या शाहरुख खान रिलीजपूर्वी अनेक धार्मिक स्थळी जाऊन चित्रपटासाठी प्रार्थना करत आहे.

महेश बाबू आणि शाहरुख : महेश बाबूनं एक्सवर लिहिले, आता 'जवान'ची वेळ आली आहे. शाहरुख खानची ताकद पूर्ण प्रदर्शनावर आहे. सर्वत्र ब्लॉकबस्टर यशासाठी मी संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो. माझ्या संपूर्ण कुटुंबासह मी चित्रपट पाहण्यास उत्सुक आहे. त्यानंतर शाहरुखनं महेश बाबूच्या ट्विटला उत्तर देत लिहिलं, मित्रा तुझे खूप खूप आभार. मला आशा आहे की तुम्हाला चित्रपट आवडेल. मला कळवा आणि मी येईन आणि तुझ्याबरोबर हा चित्रपट बघेन. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबासाठी माझ्याकडून खूप सारं प्रेम. शाहरुखची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. याशिवाय महेश बाबूच्या चाहत्यांना हे खूप आवडलं आहेत. शाहरुखच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत त्याचं कौतुक करत आहेत.

'जवान' चित्रपटाची स्टारकास्ट : 'जवान' या चित्रपटाचं दिग्दर्शन अ‍ॅटली कुमार यांनी केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती गौरी खानने केली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत शाहरुख खूप चर्चेत आहे. 'जवान' चित्रपटात शाहरुखसोबत नयनतारा आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात दीपिका पदुकोणची खास भूमिका आहे. चाहत्यांना ट्रेलरमध्ये दीपिका पदुकोणची झलक दाखवण्यात आली आहे. त्यामुळे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. 'जवान' चित्रपट जगभरात खूप कमाई करेल असं सध्या दिसत आहे.

  • Thank u so much my friend. Hope you enjoy the film. Let me know when you are watching I will come over and watch it with you. Love to you and the family. Big hug. https://t.co/xW0ZD65uvk

    — Shah Rukh Khan (@iamsrk) September 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा :

Dharmendra and Shah Rukh Khan : शाहरुख खानला 'जवान' चित्रपटासाठी धर्मेंद्र यांनी दिल्या शुभेच्छा...

Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाने 1 कोटी देणगी जाहीर केल्यानंतर, 'वर्ल्ड फेमस लव्हर'च्या निर्मात्यांनी पसरला पदर, वाचा किती झालं होतं नुकसान

Dream girl 2 collection day 13 : 'ड्रीम गर्ल 2' रिलीजच्या तेराव्या दिवशी करू शकतो 'इतकी' कमाई...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.