हैदराबाद - टॉलिवूड सुपरस्टार महेश बाबू आज 47 वा वाढदिवस साजरा करत आहेत. चाहते आणि फिल्म इंडस्ट्रीतील त्याचे सहकारी 'प्रिन्स ऑफ टॉलिवूड'चे अभिनंदन करत आहेत. महेश बाबूचा 'सरकारू वारी पाटा' हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला, ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता अभिनेता दक्षिण चित्रपट उद्योगातील दिग्गज दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्यासोबत पॅन इंडिया चित्रपटावर काम करत आहे. हा एक मेगा-बजेट प्रोजेक्ट आहे. याबद्दल महेश बाबूने अनेक मोठे खुलासे केले आहेत.
आतापर्यंत राजामौली सुपरस्टार महेश बाबूसोबत मोठा धमाका करणार असल्याची अटकळ होती. आता प्रसारमाध्यमातील बातम्यानुसार महेश बाबूने राजामौलीसोबत काम करून आपले स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले आहे. यामुळे आता आणखी एक मेगा बजेट चित्रपट साऊथ फिल्म इंडस्ट्रीत तयार होणार असल्याची हवा निर्माण झाली आहे.
'मगधीरा', 'बाहुबली' आणि 'आरआरआर' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या राजामौलीसोबत काम करणे हे प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असते. कारण राजामौली यांनी त्यांच्या करिअरमध्ये 10 ते 11 चित्रपट केले आहेत जे सर्व सुपरहिट ठरले आहेत. आता महेश बाबूने राजामौलीसोबत काम करण्याबाबत सांगितले की, त्याचे स्वप्नही पूर्ण झाले आहे.
महेश बाबू पुढे म्हणाला की, राजामौलीसोबत एक चित्रपट करताना २५ चित्रपट करण्याइतकी मेहनत घ्यावी लागते. त्याच्या चित्रपटात शारीरिकदृष्ट्या खूप मेहनत असते आणि मी त्याबद्दल उत्सुक आहे. हा संपूर्ण भारताचा चित्रपट असणार आहे, मला आशा आहे की आम्ही आमच्या देशी आणि परदेशी चाहत्यांना अनेक अडथळे पार करून एक नवीन अनुभव देऊ शकू.
महेश बाबू देखील साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा एक महत्त्वाचा सुपरस्टार आहे आणि बॉक्स ऑफिसवर बिगर हिंदी असूनही त्याचे चित्रपट मोठी कमाई करतात. नुकताच त्याचा 'सरकार वारी पाटा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 60 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 230 कोटींचा व्यवसाय केला होता.
हेही वाचा - Koffee With Karan 7: सोनम कपूरचा अर्जुनबद्दल सनसनाटी खुलासा, पाहा व्हिडिओ