ETV Bharat / entertainment

'गुंटूर कारम'च्या प्रमोशनमध्ये वडीलांच्या आठवणीनं महेश बाबू झाला भावूक

Mahesh babu : 'गुंटूर कारम' चित्रपटाचं प्रमोशन करण्यात महेश बाबू गुंतला आहे. या प्रमोशन दरम्यान त्याला त्याचे दिवंगत सुपरस्टार वडील अभिनेता कृष्णा यांची आठवण झाली आणि तो भावूक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

Mahesh babu
महेश बाबू
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2024, 5:04 PM IST

मुंबई - Mahesh babu : 'गुंटूर कारम'च्या प्रमोशनल कार्यक्रमात महेश बाबू भाषण देत असताना भावूक झाला. 9 जानेवारी रोजी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे हा भव्य कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात हजारो चाहत्यांनी हजेरी लावली होती. महेश बाबूनं भाषणादरम्यान सांगितलं की, ''ही येणारी संक्रांती त्याच्यासाठी खूप वेगळी आहे, कारण त्याचे वडील पहिल्यांदा त्याच्यासोबत नसतील.'' पुढं त्यानं म्हटलं की, ''माझे चाहते माझ्यासाठी सर्व काही आहेत.'' त्यानंतर महेश बाबूला अश्रू अनावर झाले. दरम्यान 'गुंटूर कारम'च्या प्री-रिलीज इव्हेंटनंतर, त्यानं चाहत्यांसाठी एक आभार मानणारी नोट पोस्ट शेअर केली.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

महेश बाबूनं शेअर केली पोस्ट : महेश बाबूनं या पोस्टला कॅप्शन देत लिहिलं, "धन्यवाद, गुंटूर! खूप प्रेमाने वेढलेल्या माझ्या गावामध्ये हा कार्यक्रम साजरा करणे, ही एक माझी आठवण आहे, जी मी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवीन. माझं तुम्हा सर्वांवर प्रेम आहे. माझ्या सुपरफॅन्सला मी पुन्हा भेटण्यासाठी उत्सुक आहे. संक्रांती आता सुरू होत आहे! संपूर्ण कार्यक्रमात गुंटूर पोलिसांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद.'' दुसरीकडे, नम्रतानं सोशल मीडियावर महेश बाबूच्या चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहे. महेश बाबूचा आगामी चित्रपट 'गुंटूर कारम' गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचे निर्माते सध्या प्रमोशनसाठी खूप मेहनत घेत आहेत.

'गुंटूर कारम' चित्रपटाची स्टार कास्ट : 'गुंटूर कारम' हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 2005 मध्ये 'अथडू' आणि 2010 मध्ये 'खलेजा'मध्ये एकत्र काम केल्यानंतर महेश बाबू आणि चित्रपट निर्माते त्रिविक्रम श्रीनिवास यांचा हा तिसरा एकत्रित चित्रपट आहे. 'गुंटूर कारम'मध्ये श्रीलीला, जगपती बाबू, जयराम, रम्या कृष्णन, मीनाक्षी चौधरी, प्रकाश राज आणि इतर कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट हारिका आणि हसीन क्रिएशन्स द्वारे निर्मित असून या चित्रपटाला संगीत थमन यांनी दिलं आहे.

महेश बाबू वैयक्तीक आयुष्य : महेश बाबूनं 2022 मध्ये त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना गमावले. त्याचा भाऊ रमेश बाबू, 8 जानेवारी 2022 रोजी दिर्घकाळ आजारामुळे मरण पावला. त्यानंतर 28 सप्टेंबर 2022 रोजी त्यांची आई इंदिरा देवी यांचे एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. अवघ्या दोन महिन्यांनंतर, 15 नोव्हेंबर रोजी, त्याचे वडील आणि दिग्गज अभिनेता कृष्णा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

हेही वाचा :

  1. सिद्धार्थ आनंदने 'दोस्त' हृतिक रोशनला दिल्या ५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
  2. 'बिग बॉस 17'मध्ये विक्की जैनवर नॉमिनेशननंतर भडकली मन्नारा चोप्रा
  3. हृतिक रोशन वाढदिवस : बॉलिवूडच्या ग्रीक गॉडकडे आहेत दोन अ‍ॅक्शनर्स आणि एक सुपरहिरो फ्रँचायझी चित्रपट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.