ETV Bharat / entertainment

Maadi Song Out : नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलं 'हे' गाणं; पाहा व्हिडिओ... - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Maadi Song Out: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर लिहिलेले 'माडी' आणि 'गरबो' गाणे रिलीज केले आहे. चला तर पाहूया या गाण्याची एक झलक...

Maadi Song Out
माडी गाणे झाले रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2023, 4:05 PM IST

मुंबई - Maadi song out : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'माडी' नावाचे नवीन गाणे रिलीज करून नवरात्रीची सुरुवात केली आहे. पीएम मोदींनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, त्यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. या गाण्याला दिव्या कुमारनं आवाज दिला आहे. याशिवाय मीट ब्रदर्सनं हे गाणे संगीतबद्ध केले आहे. हे गाणे गुजरातीमध्ये गायले गेले आहे आणि 9 दिवसांच्या नवरात्रोत्सवाची सुरुवात करण्यासाठी हे गाणे योग्य आहे. 'माडी' गाण्यावर गरबा केला जाऊ शकतो.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
  • Thank you @dhvanivinod, Tanishk Bagchi and the team of @Jjust_Music for this lovely rendition of a Garba I had penned years ago! It does bring back many memories. I have not written for many years now but I did manage to write a new Garba over the last few days, which I will… https://t.co/WAALGzAfnc

    — Narendra Modi (@narendramodi) October 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पीएम मोदींनी यांनी शेअर केले 'माडी' गाणे : 'माडी' हे गाणं पीएम मोदींचं यावर्षीच्या नवरात्रीसाठी लिहिलेले दुसरे गाणे आहे. शनिवारी खुलासा करत त्यांनी सांगितलं की, यापूर्वी 'गरबो' नावाचे आणखी एक गाणे त्यांनी लिहिले आहे. दरम्यान एक्सवर 'माडी' गाण्याची लिंक शेअर करताना पीएम मोदी यांनी लिहिले की, 'जशी शुभ नवरात्री जवळ येत आहे, गेल्या आठवड्यात मी लिहिलेले 'गरबो' गाणे शेअर करताना मला आनंद झाला होता. उत्सवाच्या लयीत सर्वांना आलिंगन देऊ द्या! या गरब्याला आवाज दिल्याबद्दल मी दिव्या कुमारचं आणि संगीत दिल्याबद्दल मीट ब्रदर्सचे आभार मानतो'. याआधी पीएम मोदी यांनी 'गरबो' हे गाणे रिलीज केले होते. याशिवाय त्यांनी हे गाणे काही वर्षांपूर्वी लिहिलेले होते असा देखील खुलासा केला होता.

  • As the auspicious Navratri dawns upon us, I am delighted to share a Garba penned by me during the past week. Let the festive rhythms embrace everyone!

    I thank @MeetBros, Divya Kumar for giving voice and music to this Garba.https://t.co/WqnlUFJTXm

    — Narendra Modi (@narendramodi) October 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यापूर्वी 'गरबो गाणं झालं रिलीज : नवरात्रीच्या एक दिवस आधी पंतप्रधानांनी तनिष्क बागची आणि ध्वनी भानुशाली यांच्या सहकार्यनं 'गरबो गाणं रिलीज केले होते. हे गाणं शेअर करत असताना पंतप्रधान मोदी यांनी लिहले, 'ध्वनी, तनिष्क बागची आणि जस्ट म्युझिकच्या टीमला गरब्याच्या या सुंदर सादरीकरणासाठी धन्यवाद. मी हे गाणं काही वर्षांपूर्वी लिहिले होते. त्यातून अनेक आठवणी जाग्या होतात. मी बर्‍याच वर्षांपासून काही लिहिले नाही, परंतु गेल्या काही दिवसांत मी एक नवीन गरबा लिहू शकलो, मी हे गाणे नवरात्रीच्या काळात शेअर करेन'.

यूट्यूब चॅनलवर गाणे झाले रिलीज : नवरात्रीच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदींचा 'गरबो गाण्याचा व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. ध्वनी भानुशालीने हे गाणे गायले असून तनिष्क बागचीनं या गाण्यासाठी आवाज दिला आहे. या गाण्याचे निर्माते जॅकी भगनानी आहेत. हे गाणे यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे. पीएम मोदींनी लिहिलेल्या गाण्यासोबत 'गरबो'मध्ये तनिष्क बागचीच्या आवाजाची आणि ध्वनी भानुशालीच्या आवाजाची जादू पाहायला मिळणार आहे. संगीताची ही जादू नवरात्रीच्या काळात गुजरातची संस्कृती पाहण्याची प्रेरणा देते. या गाण्याचे दिग्दर्शन नदीम शाह यांनी केले आहे.

हेही वाचा :

  1. Singham Again: दीपिका पदुकोणनं 'सिंघम अगेन'मधील शेअर केला लेडी सिंघमचा लूक, रणवीर सिंगनं 'ही' दिली प्रतिक्रिया
  2. Ind vs pak 2023 : भारतीय क्रिकेट संघाच्या शानदार विजयानंतर सेलिब्रिटींनी केला अभिनंदनाचा वर्षाव; पहा कोण काय म्हणाले...
  3. India vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्यात चक्क अरिजित सिंगनं काढला 'या' अभिनेत्रीचा फोटो; एक्सवर व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.