ETV Bharat / entertainment

'लव्हबर्ड्स' तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा एकमेकांच्या सहवासात करणार नव्या वर्षाचं स्वागत - तमन्ना आणि विजय

Tamannaah Bhatia and Vijay Varma : तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा बुधवारी सकाळी मुंबई विमानतळावरुन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सुट्टीसाठी रवाना झाले. 2024 सालाची सुरुवात ते एकमेकांच्या सहवासात करणार आहेत. विजयसोबत सुट्टीसाठी जाण्यापूर्वी तमन्नाने सोशल मीडियावर पापाराझींसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

Tamannaah Bhatia and Vijay Varma
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 27, 2023, 12:15 PM IST

मुंबई - Tamannaah Bhatia and Vijay Varma : दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर भारतीय सेलेब्रिटी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी परदेशात जातात. तिथल्या सुंदर लोकेशन्सवरुन ते चालू वर्षाला निरोप देतात आणि नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करतात. अनेक बॉलिवूड सेलेब्रिटींनीही आता या प्रवासाला सुरुवात केली आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या जोडप्यानंतर कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या पावलावर पाऊल ठेवत, तमन्ना भाटिया आणि तिचा प्रियकर विजय वर्मा यांनी 2023 ला निरोप देण्यासाठी आणि 2024 मध्ये एकत्र येण्याचा प्रवास सुरू केला आहे.

तमन्ना आणि विजय बुधवारी सकाळी मुंबई विमानतळावर दिसले. त्यांनी चाहत्यांना फोटोंसह खूश केले आणि सुट्टीसाठी फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी पापाराझींशी थोडक्यात गप्पा मारल्या. तमन्नाने डेनिमसह मॅचिंग एक आरामशीर काळा स्वेटशर्ट परिधान केला होता, जो एक कॅज्युअल पण स्टायलिश एअरपोर्ट लूक देत होता. पापाराझीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, विजय काळ्या रंगाचे जाकीट, पांढरा टी-शर्ट आणि राखाडी पँटमध्ये दिसला. विजयसोबत सुट्टीसाठी जाण्यापूर्वी तमन्नाने इन्स्टाग्राम स्टोरीजवर पापाराझींसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.

Lovebirds Tamannaah Bhatia and Vijay Varma
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा सुट्टीसाठी रवाना

एका वर्षाहून अधिक काळ एकत्र राहिल्यानंतर, या जोडप्याने गेल्या वर्षी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. नवीन वर्षाचे स्वागत करताना गोव्यातील एका पार्टीत चुंबन घेतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता. सुजॉय घोषच्या 'सेक्स विथ एक्स' या सेगमेंटमध्ये एकत्र काम करत असताना आणि नेटफ्लिक्स अँथॉलॉजी 'लस्ट स्टोरीज '2 मधील कामाच्या दरम्यान त्यांची प्रेमकथा बहरली.

कामाच्या आघाडीवर, विजय वर्माला अलीकडेच सिंगापूरमधील एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्समध्ये प्राइम व्हिडिओ शो 'दहाड'मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. तो 'मर्डर मुबारक' आणि तमिळ स्टार सुर्यासोबत आगामी चित्रपटात काम करणार आहे. दरम्यान तमन्ना भाटियाचे सरते वर्ष यशाने भरले होते. तिने 'कारदा', 'लस्ट स्टोरीज 2' पासून 'आखरी सच' पर्यंत अनेक मोठ्या चित्रपटात भूमिका साकारल्या. तिने रजनीकांत स्टारर 'जेलर'मध्येही भूमिका साकारली आणि बॉक्स ऑफिसवर विक्रम प्रस्थापित केले.

हेही वाचा -

  1. शाहरुख खान स्टारर 'डंकी'नं वाजवला जगभरात डंका, केली 'इतकी' कमाई
  2. ऑस्कर विजेता 'पॅरासाइट' स्टार ली सन क्यूनचे धक्कादायक निधन
  3. सलमान खाननं भाची आयतसोबत साजरा केला वाढदिवस , फोटो व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.