ETV Bharat / entertainment

Look back 2022 : २०२२ मध्ये ऐतिहासिक चित्रपटांनी गाजवला मराठी चित्रपट उद्योग

मराठी चित्रपट विश्वासाठी २०२२ हे वर्ष खूपच आशादायक ठरले. गेली तीन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शूटिंग सुरू राहिली नाहीत. अनेक चित्रपट यामुळे निर्मिती दरम्यान अडकले. थिएटर्स बंद राहिली, चित्रपट रिलीज थांबले अशा सर्व अडथळ्यांना पार करत अखेर २०२२ हे वर्ष नवी किरणे घेऊन आले आणि अनेक नवे प्रयोग मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये होत राहिले. बॉक्स ऑफिसवर २०२२ मध्ये ८ चित्रपटांनी सर्वाधिक कमाई केली. त्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात.

ऐतिहासिक चित्रपटांनी गाजवला मराठी चित्रपट उद्योग

author img

By

Published : Dec 28, 2022, 4:14 PM IST

२०२२ या वर्षात मराठीमध्ये एकूण ५४ चित्रपट रिलीज झाले. यावर्षी अनेक विषयांना हात दिग्दर्शकांनी घातला. यात ऐतिहासिक विषयाला प्रेक्षकांनी चांगली साथ दिली आणि बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांनी रांगा लावल्या. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावनखिंड या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली.

पावनखिंड

पावनखिंड
पावनखिंड

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावनखिंड या चित्रपटाने सर्वाधिक म्हणजे ४३ कोटींची कमाई केली. सिध्दी जोहरच्या पन्हळा किल्ल्यावरील वेढ्यातून शिताफीने छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाच्या दिशेने रवाना झाले. मागून येणाऱ्या शत्रूच्या सैन्यास बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांनी शर्थीची झुंज पावनखिंडीत दिली आणि हौतात्म्य पत्करली. या शौर्याची गाथा या चित्रपटात पाहायला मिळाली.

अभिनेते अजय पूरकर यांनी या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली. चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले, हरीश दुधाडे, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना,शिवराज वायचळ, संतोष जुवेकर, राजन भिसे, विक्रम गायकवाड, आदी कलाकारांच्या 'पावनखिंड' चित्रपटात भूमिका आहेत.

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे
धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे

प्रविण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित बायोपिक होता. या चित्रपटाने २९ कोटी रुपयांची कमाई बॉक्स ऑफिसवर केली.

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात आनंद दिघे यांच्या शीर्षक भूमिकेत प्रसाद ओक आहे. केवळ दिसण्यातील साधर्म्यच नाही तर दिघेंच्या नजरेतील जरब, चेह-यावरचे तेजस्वी आणि कणखर बाण्याचे भाव, त्यांची देहबोली, संवादफेक हे सर्वच प्रसाद ओक यांनी लिलया साकारलं होतं.

सरसेनापती हंबीरराव

सरसेनापती हंबीरराव
सरसेनापती हंबीरराव

प्रविण तरडे दिग्दर्शित सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट होता. ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही कालखंडातही स्वराज्याचे सरसेनापती होते. अत्यंत साहसी जीवन जगलेल्या हंबीरराव मोहितेंची जीवनगाथा या चित्रपटात पाहायला मिळाली होती. यात मुख्य भूमिका प्रविण तरडे यांनी साकारली होती. सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १८. २० कोटीची कमाई केली.

चंद्रमुखी

चंद्रमुखी
चंद्रमुखी

चंद्रमुखी हा २०२२ चा मराठी भाषेतील संगीतमय रोमँटिक ड्रामा चित्रपट पाटील यांच्या कादंबरीवर आधारित होता. चिन्मय मांडलेकर लिखित आणि प्रसाद ओक दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली. या चित्रपटात अमृता खानविलकर आदिनाथ कोठारे आणि मृण्मयी देशपांडे यांच्या मुख्य मुख्य भूमिका होत्या. अजय-अतुल या जोडीने या चित्रपटाची संगीत सजवले होते. यातील चंद्रा हे गाणे खूप गाजले.

लोच्या झाला रे

लोच्या झाला रे
लोच्या झाला रे

पारितोष पेंटर यांनी दिग्दर्शित केलेला लोच्या झाला रे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १३.५८ कोटींची कमाई केली. धमाकेदार लोच्या करणाऱ्या 'लोच्या झाला रे' या चित्रपटाने महाराष्ट्रासह परदेशातील प्रेक्षकांनाही लोटपोट हसवले. लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत आयडिया दि एंटरटेनमेंट कंपनी व अभिनय मुंबई प्रॉडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर व शांताराम मनवे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर मंगेश जगताप कार्यकारी निर्माते आहेत.

टाईमपास ३

टाईमपास ३
टाईमपास ३

दिग्दर्शक रवी जाधव यांच्या टाईमपास चित्रपटाचा हा तिसरा सिक्वेल बॉक्स ऑफिसवर १२.१५ कोटी कमवून गेला. प्रेक्षकांचा ‘वेळ घालविण्यासाठी’ दिग्दर्शक रवी जाधव यांनी पहिला ‘टाइमपास‘ बनविला होता आणि त्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. 'टाइमपास' म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दगडू आणि प्राजूची जोडी आणि त्यांची आगळी वेगळी लव्हस्टोरी. पहिल्या भागात प्रेक्षकांच्या मनाला हुरहूर लावून अधुरी राहिलेली प्रेमकथा दुसऱ्या भागात प्रेक्षकांना आनंद देत पूर्ण झाली. पहिल्या भागात बालपणात एकमेकांपासून दुरावलेले दगडू आणि प्राजू दुसऱ्या भागात तरुणपणात एकमेकांना भेटले आणि एकही झाले. याच बालपण आणि तरुणपणाच्या मधल्या टप्प्यात दगडूचं नेमकं काय झालं, प्राजू त्याच्यापासून दूर गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय काय बदल झाले, हे सांगणारी गोष्ट आता टाइमपास ३ मधून प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आली.

या चित्रपटात दगडूच्या भूमिकेतील प्रथमेश परब आणि पालवी हृता दुर्गुळेसोबतच, माधव लेले उर्फ शाकाल म्हणजेच वैभव मांगले, शांताराम परब म्हणजे भाऊ कदम, आरती वडगबाळकर, दगडू गॅंग आणि एका जबरदस्त भूमिकेत संजय नार्वेकर पाहायला मिळाले.

झोंबिवली

झोंबिवली
झोंबिवली

मराठीमध्ये प्रथमच ‘झोंबीज’ जॉनर चा हॉरर चित्रपट बनला आणि याने बॉक्स ऑफिसवर ११ कोटींची कमाई केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केला होता. ‘झोंबिवली’ या चित्रपटात अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी या त्रिकुटाचा ‘झोंबी’ कल्ला प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला. ‘झोंबिवली’ ची निर्मिती यॉडली फिल्म्सच्या बॅनरखाली झाली असून याची प्रस्तुती सारेगमने केली होती.

शेर शिवराज

शेर शिवराज
शेर शिवराज

शेर शिवराज हा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर, दिग्पाल लांजेकर, नितीन केणी, प्रद्योत पेंढारकर आणि अनिल वरखडे निर्मित 2022 चा भारतीय मराठी भाषेतील ऐतिहासिक अॅक्शन ड्रामा चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०.४४ कोटींची कमाई केली.

हर हर महादेव

हर हर महादेव
हर हर महादेव

हर हर महादेव हा २०२२ चा भारतीय मराठी भाषेतील ऐतिहासिक अॅक्शन ड्रामा चित्रपट प्रेक्षकांच्या पंतीस उतरला. या चित्रपटातील काही प्रसंग वादग्रस्त ठरले. अभिजीत देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाने ८.९ कोटीची कमाई केली.

हेही वाचा - विकी कौशलने सुट्टीचे फोटो हटवले, फॅन्स म्हणतात, 'बायकोकडून शिकला'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.