ETV Bharat / entertainment

HBD Mouni Roy: शिक्षण मध्येच सोडून मुंबई गाठत मौनी रॉयने मिळवली अफाट लोकप्रियता - मौनी रॉय लेटेस्ट न्यूज

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय आज आपला ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. लाखो चाहत्यांशी सोशळ मीडियाच्या माध्यमातून दैनंदिन संपर्कात असणारी मौनीचे आयुष्य एखाद्या परिकथेप्रमाणे सुंदर आणि आकर्षक आहे. आज वाढदिवसानिमित्य तिच्या कारकिर्दीविषयी अधिक जाणून घेऊयात.

अभिनेत्री मौनी रॉय
अभिनेत्री मौनी रॉय
author img

By

Published : Sep 28, 2022, 12:24 PM IST

मुंबई - सुंदर अभिनेत्री मौनी रॉयने छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. अलिकडे प्रदर्शित झालेल्या तिच्या ब्रम्हास्त्र चित्रपटाने यशाचा ध्वज फडकत ठेवला आहे. यातील तिच्या भूमिकेचे खूप कौतुक होत आहे. अशी ही सौंदर्यवती मौनी रॉय आज आपला ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे.

अभिनेत्री मौनी रॉय
अभिनेत्री मौनी रॉय

मौनी रॉयचा जन्म 28 सप्टेंबर 1985 रोजी पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे झाला. मौनी रॉय बंगाली कुटुंबातील आहे. तिला सुरुवातीपासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. मौनी रॉयने तिचे शालेय शिक्षण पश्चिम बंगालमधूनच पूर्ण केले आहे. यानंतर तिने दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. मौनी रॉयच्या आई-वडिलांची इच्छा होती की तिने पत्रकार व्हावे. यासाठी तिने जामिया मिलिया इस्लामियाच्या मास कम्युनिकेश अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता. मौनी रॉयला सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती, त्यामुळे तिने मास कम्युनिकेशनचे शिक्षण मधेच सोडले आणि ती मुंबईला आली. मौनी रॉय पहिल्यांदा अभिषेक बच्चन आणि भूमिका चावला यांच्या 'रन' चित्रपटातील एका गाण्यात बॅकग्राउंड डान्सर म्हणून दिसली होती.

अभिनेत्री मौनी रॉय
अभिनेत्री मौनी रॉय

मौनीने तिच्या करिअरची सुरुवात 2007 मध्ये लोकप्रिय टीव्ही शो 'क्यूंकी सास भी कभी बहू थी'मधून केली होती. त्यानंतर ती कस्तुरी, देवों के देव महादेव, नागिन, नागिन 2, नागिन 3, टशन-ए-इश्क, जुनून, ऐसी नफरत तो कैसा इश्क, कृष्णा चली लंडन, झलक दिखला जा 9, एक था राजा एक थी रानीमध्ये दिसली. पण कलर्स टीव्हीवरील 'नागिन' या मालिकेमुळे ती इतकी प्रसिद्ध झाली की ती घराघरात प्रसिद्ध झाली. 'देवों के देव महादेव'मधील मौनीच्या सतीच्या पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली. पण तिला खरी ओळख नागिन या मालिकेमुळेच मिळाली.

अभिनेत्री मौनी रॉय
अभिनेत्री मौनी रॉय

यानंतर मौनी रॉयने छोट्या पडद्यावरील 'नागिन', 'नागिन 2', 'कस्तुरी', 'जुनून-ऐसी नफरत तो कैसा इश्क' आणि इतर अनेक मालिकांमध्ये तिचे अभिनय कौशल्य दाखवले. मौनी रॉयच्या चित्रपट प्रवासाविषयी बोलायचे झाले तर ती 2011 मध्ये 'हीरो हिटलर इन लव्ह' या पंजाबी चित्रपटात दिसली होती. यानंतर तिने 2018 मध्ये अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. मौनी रॉय आत्तापर्यंत 'रोमियो अकबर वॉल्टर', 'मेड इन चायना' आणि 'लंडन कॉन्फिडेन्शियल'मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून झळकली आहे. नुकतीच ती ब्रह्मास्त्र या चित्रपटातही दिसली आहे.

अभिनेत्री मौनी रॉय
अभिनेत्री मौनी रॉय

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर मौनी रॉयने या वर्षाच्या सुरुवातीला तिचा दीर्घकाळचा प्रियकर सूरज नांबियारसोबत लग्न केले. दोघांचे लग्न गोव्यात मोठ्या थाटामाटात पार पडले. दोघांचे लग्न आधी मल्याळी आणि नंतर बंगाली पद्धतीने पार पडले. मौनी सध्या पतीसोबत वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे.

हेही वाचा - Exclusve Interview : महाराष्ट्रीयन माधुरी दीक्षित नेने गुजरातीमध्ये म्हणतेय ती आहे ‘मजा मा’!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.