मुंबई - ज्येष्ठ अभिनेता जावेद खान अमरोही यांचे श्वासोच्छवासाचा त्रासाने निधन झाले आहे. आज संध्याकाळी त्यांच्यावर मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंतिम संस्कार पार पडणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना श्वास घेताना त्रास होत होता. यामुळे ते अंथरुणावरच खिळून होते. त्यांचा त्रास वाढल्याने त्यांना मुंबईतील सांताक्रूझ भागातील सूर्या नर्सिंग होममध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याच ठिकाणी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला.
जावेद खान अमरोही यांचे लगान चित्रपटातील सहकलाकार अभिनेता अखिलेंद्र मिश्रा यांनी त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावरुन दिली. त्यांनी लिहिले की, 'जावेद खान साहेबांना विनम्र श्रद्धांजली. ते एक महान अभिनेता, ज्येष्ठ कलाकार, आयपीटीएचा सक्रिय सदस्य होते.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
जावेद खान अमरोही यांनी दूरदर्शनच्या मालिकांपासून बॉलिवूड सिनेमाचा रुपेरी पडदा गाजवला होता. त्यांनी बॉलिवूड चित्रपट लगान, अंदाज अपना अपना, चक दे इंडिया, कुली नंबर 1 यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांची मिर्झा गालिब आणि नुक्कड ही टीव्ही मालिका प्रचंड गाजली होती. मूळात त्यांचा अभिनय बहरला तो रंगभूमीवर. अनेक नाटाकातून भूमिका केल्यानंतर टीव्ही मालिका आणि चित्रपट त्यांच्याकडे चालून आले. इप्टा या प्रगतशील नाटकाच्या चळवळीचे ते महत्त्वाचे सदस्य होते.
लगानमध्ये राम सिंगची संस्मरणीय भूमिका - जावेद खान अमरोही यांची लगान चित्रपटातील भूमिका संस्मरणीय ठरली होती. यामध्ये त्यांनी राम सिंग ही व्यक्तीरेखा साकारली होती. राम सिंग हा ब्रिटीशांसाठी काम करणारा नोकर होता. या चित्रपटात लगान टीमसाठी मदत करणाऱ्या एलिझाबेथ या ब्रिटीश तरुणीला गावकऱ्यांची भाषा रुपांतरीत करुन साकारणारा दुभाषी म्हणून जावेद खान अमरोही यांनी केलेले काम प्रेक्षक कधीच विसरले नाहीत. अखेर हाच राम सिंग ब्रिटीशांची नोकरी सोडतो आणि लगानसाठी मैदानात उतरलेल्या गावकऱ्यांच्या मदतीला धावून येतो.
नुक्कडमधील करीम हजाम - नुक्कड या गाजलेल्या टीव्ही मालिकेमध्ये जावेद खान अमरोही यांनी करीम हजाम ही व्यक्तीरेखा साकारली होती. या मालिकेत करीमचे छोटेसे केश कर्तनालय दाखवण्यात आले होते. या मालिकेतील त्यांची भूमिका खूच चर्चेत राहिली होती.
जावेद खान अमरोही यांनी साकारलेल्या भूमिकामध्ये लगानमधील राम सिंग, हम हैं राही प्यार के चित्रपटामधील छोट्या, चक दे इंडिया मधील सुखलाल यांसारख्या त्यांच्या काही व्यक्तीरेखा अजूनही लोकांच्या मनात ताज्या आहेत. त्यांनी आपल्या करिअरमध्ये 150 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचे खरोखरच मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - Hariharan and Bickram Ghosh Exclusive : गायक हरिहरन आणि तबलावादक बिक्रम घोष यांच्याशी 'मनमर्जी' बातची