मुंबई - एकाच दिवसात जास्तीत जास्त गाणी गाण्याचा गिनीज विश्वविक्रम प्रस्थापित करणारे ख्यातनाम पार्श्वगायक कुमार सानू यांना त्यांची मुलगी शेनॉन के हिने संजय मिश्रा, मिता वसिष्ठ आणि विवेक दहिया यांच्यासमवेत 'चल जिंदगी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्याबद्दल माहिती नव्हती. शेनॉन के ही अमेरिकेतील लोकप्रिय भारतीय गायिका आणि अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूड चित्रपट साईन केला व चित्रपटाचे शूटिंग सुरू केले याच्याबद्दल गायक कुमार सोनू यांना काहीच माहिती नव्हते. पण आता कळल्यानंतर मात्र त्यांना धक्का बसला आहे.
कुमार सानू म्हणाले, काही दिवस शूटिंग सुरू केल्यानंतर शेनॉनने मुंबईत येऊन मला ही बातमी नंतर सांगितली. मला सांगण्याआधीच तिला सर्व गोष्टींची खात्री करून घ्यायची होती कारण मी कशी प्रतिक्रिया देईन याबद्दल ती थोडी घाबरलेली होती. शॅननने 'चल जिंदगी'मध्ये पदार्पण केले आहे हे मला का माहीत नव्हते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
त्यांनी पुढे नमूद केले, 'ती तिच्या कामाचे निर्णय स्वतः घेते कारण आम्ही पालक म्हणून तिला स्वतंत्र होण्यासाठी वाढवले. ती एक अतिशय आज्ञाधारक मूल आहे आणि तिच्या आईसोबत सर्व काही शेअर करते. मी थोडा कडक आहे त्यामुळे ती कधीकधी घाबरते. तिने अत्यंत उत्तम कलाकारांसोबतचा चित्रपट निवडला आहे, याचा मला अभिमान आहे.'
चल जिंदगीचे दिग्दर्शन विवेक शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटात विवेक दहिया, संजय मिश्रा, मीता वशिस्त, विवान शर्मा आणि विक्रम सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा चार मुख्य नायकांभोवती फिरते. यातील पहिला सना ही अमेरिकेतील संगीत विद्यार्थी आहे, साहिल हा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे, सदानंद जो सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आहे आणि 10 वर्षांचा लोककलाकार विवान यांची कथा यात मांडण्यात आली आहे. एके दिवशी हे सर्वजण हार्ले डेव्हिडसन बाईकवरून वेगवेगळ्या शहरांतून लेह-लडाखमधील जगातील सर्वात उंच मोटारीयोग्य रस्त्यावरून प्रवास सुरू करतात.
दरम्यान, चार दशकांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात कार्यरत असलेला कुमार सानू सध्या स्टेज शो आणि त्याच्या स्वतंत्र सिंगल्समध्ये बिझी आहे. कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू हा बिग बॉस १४ मध्ये स्पर्धक म्हणून आला होता. त्यावेळी त्याने निक्की तांबोळीसोबत झालेल्या भांडणात मराठी विषयी भाष्य केल्यानंतर वादंग निर्माण झाले होते. अखेर त्याने जाहीर माफी माफी मागितली होती.