ETV Bharat / entertainment

Ganapath : 'गणपथ : अ हिरो इज बॉर्न' या चित्रपटात टायगर श्रॉफ-क्रिती सेनॉनचा पाहायला मिळणार वेगळा 'अंदाज'... - क्रितीने घेतली गणपथ चित्रपटासाठी कठीण ट्रनिंग

Ganapath : अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेत्री क्रिती सेनॉन यांचा 'गणपथ : अ हिरो इज बॉर्न' हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर झळणार आहे. 'गणपथ' या चित्रपटासाठी क्रितीनं खूप मेहनत घेतली आहे.

Ganapath
गणपथ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 7:32 PM IST

मुंबई Ganapath : अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेत्री क्रिती सेनॉन स्टारर 'गणपथ : अ हिरो इज बॉर्न' हा चित्रपट 20 ऑक्टोबरला रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. 'गणपथ' एक फ्युचरिस्टिक अ‍ॅक्शन चित्रपट आहे. पूजा एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटामध्ये दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन देखील दिसणार आहे. या चित्रपटामध्ये टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन हे अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसतील. टीझर आणि ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटामध्ये पहिल्यांदा क्रिती सेनॉन पूर्णपणे वेगळ्या अवतारात प्रेक्षकांना दिसणार आहे. 'गणपथ' चित्रपटाच्या अ‍ॅक्शन सीनसाठी क्रिती सेनॉननं खूप मेहनत घेतली आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

क्रिती सेनॉन नव्या अवतारात : 'गणपथ'च्या ट्रेलरमध्ये क्रिती सेनॉनला बाइक चालवताना दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटातील खास भूमिकेसाठी ती बाइक चालवायला शिकली. बाईक शिकण्याबरोबरच, क्रितीनं चित्रपटातील स्फोटक अ‍ॅक्शन सीक्वेन्स करण्यासाठी कठोर मेहनत घेतली होती. या चित्रपटासाठी तिनं नऊ महिने प्रशिक्षण घेतलं होतं. 'गणपथ'च्या जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्समध्ये टायगर श्रॉफच्या नव्या जगात प्रेक्षक एन्ट्री करतील, कारण या चित्रपटाची कहाणी 2070मध्ये सुरू होताना दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट विज्ञान आणि मानवामधील होणाऱ्या युद्धावर आधारित असणार आहे.

'गणपथ' चित्रपटाबद्दल : पूजा एंटरटेनमेंट गुड कंपनीच्या सहकार्यानं हा चित्रपट सादर केला जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. वासू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. क्रिती सेनॉन आणि टायगर श्रॉफ जोडी यापूर्वी 'हिरोपंती' या चित्रपटामध्ये झळकली होती. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट झाला होता. क्रितीच्या वर्क्रफंटबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटी 'आदिपुरुष' या चित्रपटामध्ये साऊथ स्टार प्रभाससोबत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.

हेही वाचा :

  1. India vs Pakistan Cricket World Cup 2023:अरिजित सिंगच्या जादूनं खचाखच भरलेल्या स्टेडियमला घातली भुरळ
  2. Sam Bahadur : विकी कौशलनं हुबेहुब साकारले सॅम माणेकशॉ , उलगडला भारतीय सैन्याचा वैभवशाली इतिहास
  3. PM Narendra Modi turns lyricist : नरेंद्र मोदी बनले गरबा गाण्याचे गीतकार, ध्वनी भानुशालीनं गायलं गीत..कंगनानं दिली प्रतिक्रिया - पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.