ETV Bharat / entertainment

KK 1st Death Anniversary : केके ची पहिली पुण्यतिथी, गायकाच्या मृत्यूमागील ५ कारणे - दुःखद निधन

​​आज 31 मे रोजी गायक केके यांची पहिली पुण्यतिथी आहे. त्यांचे कोलकाता येथे एका कॉन्सर्टमध्ये गाणे सादर करत असताना दुःखद निधन झाले.

KK 1st Death Anniversary
केके यांची पहिली पुण्यतिथी
author img

By

Published : May 31, 2023, 5:00 PM IST

मुंबई : 'पलाद आयेंगे कल' आणि 'तडप-तडप' यांसारख्या सदाबहार गाण्यांनी प्रसिद्ध गायक केके यांची आज, 31 मे रोजी पहिली पुण्यतिथी आहे. 31 मे 2022 रोजी कोलकाता येथे एका कॉन्सर्टमध्ये गायकाचे दुःखद निधन झाले होते, ज्यामुळे संपूर्ण देशात शोकाचे वातावरण पसरले होते. केके ज्या ठिकणी गाणे सादर करत होते, तिथे अनेक प्रकारचा निष्काळजीपणा होता, ज्यामुळे केकेचा मृत्यू झाला असावा असे म्हटले जाते. आज केके यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त आपण जाणून घेणार आहोत त्या 5 मोठ्या चुका ज्यांमुळे केके यांचा मृत्यू झाला.

प्राथमिक कारण : मैफिलीचे हॉल हे गायकाच्या मृत्यूचे पहिले कारण होते. प्रेक्षकांनी खचाखच खचाखच भरलेले होते शिवाय या कॉन्सर्ट हॉलमध्ये एसीची सुविधा नव्हती, तर केके यांनी याबाबत वारंवार तक्रार केली ते घामाने भिजत होते. असे असतानाही केके स्वत;ची काळजी न घेता ते या कॉन्सर्टमध्ये गात होते.

दुसरे कारण : केकेच्या मृत्यूचे दुसरे कारण म्हणजे कॉन्सर्ट हॉलमध्ये प्रेक्षक हे फार जास्त प्रमाणात होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 3 हजार क्षमतेच्या हॉलमध्ये 7 हजारांहून अधिक प्रेक्षक त्यांचा कार्यक्रम ऐकण्यासाठी आले होते.

तिसरे कारण : केकेच्या मृत्यूच्या तिसऱ्या कारणामध्ये असे म्हणता येईल की कॉन्सर्ट हॉलची एवढी दुरवस्था होऊनही तेथे कोणतीही आपत्कालीन सुविधा ही उपस्थित नव्हती. अशा परिस्थितीत केकेची तब्येत बिघडली आणि प्रेक्षकांच्या गर्दीमधून त्यांना तिथून नेण्यात आले त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.

चौथे कारण: केके वारंवार मंचावर त्यांच्या प्रकृतीबाबत आयोजकांना सांगत होते, पण त्याकडे लक्ष दिले गेले नाही आणि केके हे स्टेजवरून खाली बॅक स्टेज गेले मात्र त्यांना हॉस्पिटल लगेचच नेण्यात आले नाही, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये केके अस्वस्थ दिसत आहे शिवाय ते लिफ्टमध्ये इकडे तिकडे फिरत असल्याचे दिसत आहे.

पाचवे कारण : सिंगरची तब्येत बिघडत असताना त्यांना त्या काळात सीपीआर (कार्डिओ पल्मोनरी रिसुसिटेशन) उपचार द्यायला हवे होते. असे केले असते तर आज केके आपल्यासोबत असते. अशा स्थितीत हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यास उशीर झाल्याने गायक यांचा वाटेतच मृत्यू झाला.

हेही वाचा :

  1. Anushka and Sakshi childhood friend : अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी या निघाल्या बालपणीच्या मैत्रिणी
  2. Kamal Haasan in Project K? : प्रभासच्या विरोधात 'प्रोजेक्ट के'मध्ये खलनायक साकारणार कमल हासन
  3. Amir Khan breaks silence : आमिर खानने आगामी चित्रपटाबद्दल सोडले मौन, जाणून घ्या काय म्हणाला...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.