ETV Bharat / entertainment

KBKJ teaser with Pathan : पठाणसोबत किसी का भाई किसी की जानचा टीझर, सलमान खानच्या फॅन्सचा आनंद भिडला गगनाला - teaser out with Pathaan

शाहरुख खानच्या पठाण चित्रपटामधून किसी का भाई किसी की जानचा टीझर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सलमान खानच्या चित्रपटाचा टीझर लवकरच अधिकृतपणे प्रदर्शित होणार आहे पण त्याआधीच सुपरस्टारच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घातला आहे. प्रतिक्रियांसाठी पुढे स्क्रोल करा.

KBKJ teaser with Pathan
KBKJ teaser with Pathan
author img

By

Published : Jan 25, 2023, 3:47 PM IST

मुंबई - सलमान खानच्या आगामी चित्रपट किसी का भाई किसी की जानचा टीझर 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या पठाण या अ‍ॅक्शन चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान थिएटरमध्ये दाखवण्यात आला. टीझरची सुरुवात सलमान बाईक चालवताना होते आणि नंतर मेट्रोमध्ये तो बदमाशांना बेदम चोपतो. यात तो अभिनेत्री पूजा हेगडेवर रोमान्स करताना दिसत आहे. जवळजवळ एक मिनिट-40-सेकंदाच्या टीझरमध्ये मारामारीची दृश्ये देखील दर्शविली गेली आहेत, जिथे सलमान रफ आणि टफ दिसत असून, इमारतीवरून उडी मारताना आणि जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसत आहे.

किसी का भाई किसी की जानच्या टीझरने सलमानच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. किसी का भाई किसी की जानच्या टीझरवर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत. या चित्रपटात सलमान एका नवीन अवतारात दिसणार आहे, असा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. टीझरवर प्रतिक्रिया देताना अफानने लिहिले, 'प्रामाणिक कबुलीजबाब: मला अपेक्षित नव्हते.. पण हा मास टीझर आहे जबरदस्तच. सर्वत्र ब्लॉकबस्टर लिहिलेले आहे. भाईजानचा आवाज.. गूजबंप्स. आणि आमची #शेहनाझ गिल मोठ्या स्क्रीनवर सलमानसोबत. तेही दक्षिण भारतीय लूकमध्ये, भारीच. ' आणखी एका चाहत्याने लिहिले, शेवटी टायगर आणि पठाण एकत्र येऊन जाळ करताना दिसले. याला म्हणतात बवाल. दुसर्‍या चाहत्याने लिहिले, किसी का भाई किसी की जान पाहिल्यानंतर मला आता आणखी खात्री वाटते की हा एक मोठा ब्लॉकबस्टर ठरणार आहे!! सलमान खान बॉक्स ऑफिसवर बवाल करणार हे नक्की.

फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात व्यंकटेश दग्गुबती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल यांच्या भूमिका आहेत. टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आणि शहनाज गिल या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहेत.

याआधीही चित्रपटाचे शीर्षक काही वेळा बदलण्यात आले आहे. सलमानचा मेव्हणा आयुष शर्माने निर्मात्यांशी 'क्रिएटिव्ह डिफरन्स'मुळे हा चित्रपट सोडल्याची माहिती आहे. मात्र, हा चित्रपट यावर्षी ईदला रिलीज होणार आहे. पूर्वी या चित्रपटाचे शीर्षक कभी दिवाली कभी ईद असे ठरले होते. त्यात बदल करुन किली का भाई किसी की जान असे नवे शीर्षक ठरले आणि हा निर्णय योग्य होता असेच आता चाहत्यांना वाटू लागले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता मात्र आता लागून राहिली आहे.

हेही वाचा - Srk Fans Celebrate Pathaan Release : शाहरुखच्या जबरा फॅन्सचा देशभर जल्लोष, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.