मुंबई - सुपरस्टार सलमान खान चार वर्षांच्या विश्रांतीनंतर 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट ईदच्या निमित्ताने रिलीज करतोय. बॉक्स ऑफिसवर कमाईचे खाते दुहेरी अंकाने उघडले आहे परंतु ही कमाईची संख्या त्याच्या शेवटच्या ईद रिलीज भारत चित्रपटाच्या जवळपासही नाही.
पहिल्या दिवशीची सुरुवात संथ गतीने - किसी का भाई किसी की जान चित्रपटाची पहिल्या दिवशी संथ सुरुवात झाली. बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 15 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. मल्टिप्लेक्स साखळींच्या तुलनेत मास सर्किट्समध्ये या चित्रपटाने तुलनेने चांगली कामगिरी केल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार, किसी का भाई किसी की जानने पहिल्या दिवशी 13.75 कोटी ते 15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सलमानचा पूर्वीचा ईद रिलीज झालेला भारत 42.30 कोटी रुपयांची कमाई करण्यात यशस्वी झाला होता, तर KKBKKJ दिवस 1 चे सुरुवातीचे अहवाल कमी रोमांचक दिसत होते. Sacnilk च्या मते, हिंदी बाजारपेठेत केवळ 15.33% व्याप नोंदवला गेला.
पहिल्या वीकेंडकडून मोठ्या कमाईची अपेक्षा - शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या पठाण चित्रपटानंतर, सलमानचा किसी का भाई किसी की जान हा हिंदी चित्रपट उद्योगासाठी आणखी एक गेम-चेंजर रिलीज असल्याचे समजले गेले. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. आता वीकेंडला सणासुदीच्या हंगामात भर पडते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. ईदच्या निमित्ताने शनिवारी सुट्टी आहे. रविवारीही सुट्टी असल्यामुळे हे दोन्ही दिवस चित्रपटासाठी खूप लाभदायक ठरु शकतात.
फरहाद सामजी दिग्दर्शित, किसी का भाई किसी की जान हा सलमान खानचा होम प्रॉडक्शन आहे आणि बिग बॉस 13 स्टार शहनाज गिलचे पदार्पण आहे. साऊथ स्टार व्यंकटेश दग्गुबाती, पूजा हेड्डे, पंजाबी अभिनेता-गायक जस्सी गिल, राघव जुयाल, पलक तिवारी आणि इतर कलाकारांचा समावेश आहे. दक्षिण भारतातही या वीकेंडला चांगला प्रतिसाद मिळू शकतो.