मुंबई - Kirti Senons Ganpath first look टायगर श्रॉफच्या आगामी 'गणपथ' चित्रपटातील क्रिर्ती सेनॉनचा फर्स्ट लूक लॉन्च करण्यात आलाय. मंगळवारी टायगरने इन्स्टाग्रामवर स्वतःचा आणि क्रितीचा फर्स्ट लूक शेअर केला.
'छोटी बच्ची हो क्या?' हा हिरोपंथी या चित्रपटातील टायगर श्रॉफचा डायलॉग खूप लोकप्रिय आहे. त्याचे अनेकदा मीम्सही बनत असतात. हाच संवाद वेगळ्या अर्थाने गणपथ चित्रपटात टायगरने वापरला आहे. हा डायलॉग वापरत किर्ती सेनॉनच्या फर्स्ट लूकवर प्रतिक्रिया देताना टायगरनं लिहिलंय, 'अब तू छोटी बच्ची नहीं रही.' क्रिती सेनॉनने टायगर श्रॉफची पोस्ट पुन्हा पोस्ट केली आणि लिहिलं, 'हाहाहाहाहाहाहाहा!!! अखेरीस! बेस्टटसह अॅक्शन फिल्म!'
पूजा एंटरटेनमेंट या गणपथ चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसने इन्स्टाग्रामवर लिहिलंय, 'ती भयानक आहे. ती सुसाट आहे. ती मरायलाही तयार आहे. या दसऱ्यात २० ऑक्टोबरला थिएटरमध्ये भेटा जस्सी हिला. #गणपथ'. या चित्रपटात किर्ती सेनॉन जस्सी ही व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. वरील वर्णनावरुन आपल्या लक्षात येईन की क्रिर्ती सेनॉन यात एक अतिशय आक्रमक अशा अवतारात झळकणार आहे. गणपथ या चित्रपटाचे संपूर्ण शीर्षक आहे, 'गणपथ : अ हिरो इज बॉर्न'. क्रिती सेनॉनशिवाय या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि अमिताभ बच्चन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
‘गणपथ - अ हिरो इज बॉर्न’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक व्हिज्युअल ट्रीट असणार आहे. हाय ऑक्टेन अॅक्शन सीक्वेन्सला मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीत स्कोअरची जोड निर्माते देणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना एक भरपूर मनोरंजनाची मेजवानी देण्याचा घाट दिग्दर्शकाने घातला आहे. हा चित्रपट 20 ऑक्टोबरला देशभर थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पूजा एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि विकास बहल दिग्दर्शित, 'गणपथ - अ हिरो इज बॉर्न' ची निर्मिती वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल यांनी संयुक्पेणे केली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषेत जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.
'गणपथ' या चित्रपटाशिवाय टायगर श्रॉफकडे अक्षय कुमारसोबत 'बडे मियाँ छोटे मियाँ' हादेखील चित्रपट आहे. हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिल महिन्यात ईदच्या निमित्तानं पाच भाषामध्ये रिलीज करण्यात येणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित कुमारसोबत 'बडे मियाँ छोटे मियाँ' स्कॉटलंड, लंडन, भारत आणि यूएई येथील सुंदर लोकेशन्सवर शूट करण्यात आलाय. क्रिर्ती सेनॉनच्या कामाचा विचार करता ती करीना कपूर खान, तब्बू आणि दिलजीत दोसांझ यांच्यासोबत ‘द क्रू’ मध्येही दिसणार आहे.
हेही वाचा -
१. Srk At Ambanis Ganesh :अंबानींच्या घरी गणेश दर्शनाला कुटुंबीयांसह शाहरुख खानची ग्रँड एन्ट्री
३. Shehnaaz Gill on Niagara Falls : शहनाज गिलने आईसह लुटला नायगरा धबधब्याचा आनंद, पाहा व्हिडिओ