ETV Bharat / entertainment

king of kotha box office collection Day 5 : दुल्कर सलमान स्टारर 'किंग ऑफ कोठा'नं केली बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई.... - बॉक्स ऑफिस

अभिनेता दुल्कर सलमानचा 'किंग ऑफ कोठा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने 5 दिवसात जोरदार कमाई केली आहे.

Dulquer salmaan
दुल्कर सलमान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 11:22 AM IST

मुंबई : साऊथ अभिनेता दुल्कर सलमान स्टारर 'किंग ऑफ कोठा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. दुल्कर सलमान हा पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसला आहे. 'किंग ऑफ कोठा' हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला आहे. या चित्रपटाला रिलीज होऊन 5 दिवस झाले आहेत. 'किंग ऑफ कोठा' बॉक्स ऑफिसवर चांगलीच जादू दाखवत आहे. चित्रपटगृहांमध्ये चाहते या चित्रपटाचा आनंद घेत आहेत. 'किंग ऑफ कोठा'मध्ये दुल्करने एका गँगस्टरची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेला चाहते खूप पसंत करत आहेत.

'किंग ऑफ कोठा'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'किंग ऑफ कोठा' या चित्रपटाने पहिल्या दिवशी 6.85 कोटी, दुसऱ्या दिवशी 2.6 कोटी, तिसऱ्या दिवशी 2.05 कोटी, चौथ्या दिवशी 1.95 कोटी, पाचव्या दिवशी 1.14 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 5 दिवसात 14 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट 6व्या दिवशी 1.13 कोटी कमाई करू शकेल असा अंदाज वर्तविला जात आहे. लवकरच हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

'किंग ऑफ कोठा'चे बॉक्स ऑफिस कमाई

  • पहिला दिवस 6.85 कोटी
  • दुसरा दिवस 2.6 कोटी
  • तिसरा दिवस 2.05 कोटी
  • चौथ्या दिवस 1.95 कोटी
  • पाचवा दिवस 1.14 कोटी

एकूण ₹ 14.59 कोटी

'किंग ऑफ कोठा' चित्रपटाची स्टारकास्ट : 'किंग ऑफ कोठा' या अ‍ॅक्शन चित्रपटात दुल्कर सलमान, रितिका सिंग, ऐश्वर्या क्षमी, सौबिन शाहीर आणि नायला उषा यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित अभिलाष जोश यांनी केले आहे. साऊथ चित्रपटसृष्टीत दुल्करचे खूप कौतुक केले जात आहे. हा एक अ‍ॅक्शन चित्रपट आहे. लवकरच 'किंग ऑफ कोठा' हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित होणार आहे, तेव्हा चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होईल, असे मानले जात आहे. सध्या साऊथमध्ये हा चित्रपट चांगली कमाई करत आहे.

हेही वाचा :

  1. Jawan trailer date locked: शाहरुखने शेअर केली 'रमैय्या वस्तावैय्या' गाण्याची झलक, 'रक्षा बंधना'ला होणार मोठा धमाका
  2. Subhedar first week end BO : 'सुभेदार' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर पहिल्या आठवड्यात दमदार कमाई
  3. Jailer box office collection:रजनीकांतच्या 'जेलर'चा बॉक्स ऑफिसवर १९ व्या दिवशीही दबदबा कायम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.