मुंबई : शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट पठाण देशात आणि जगात प्रसिद्ध होत आहे. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 8 दिवसांत 667 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट दहाव्या दिवशी थिएटरमध्ये सुरू आहे. आता प्रसिद्ध ब्राझिलियन लेखक आणि गीतकार पाउलो कोएल्हो यांनी शाहरुख खान आणि त्याच्या 'पठाण' चित्रपटाच्या स्तुतीसाठी पुढे आला आहे. पाउलोने सोशल मीडियावर पठाणचे कौतुक करताना एक पोस्ट शेअर केली आहे. पाउलोने शाहरुख खानच्या त्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामध्ये शाहरुख 'पठाण' हिट झाल्यानंतर त्याच्या आलिशान बंगल्यातील मन्नत बाहेर चाहत्यांना शुभेच्छा देत होता.
पाउलोने काय लिहिले? : आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये पाउलोने शाहरुखची स्तुती करताना लिहिले आहे की, "किंग, लीजेंड, मित्र.. सर्वांत महान अभिनेता, जे शाहरुखला पाश्चात्य देशांमध्ये ओळखत नाहीत त्यांनी माय नेम इज खान पाहावा". या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना पाउलोने शाहरुख खानला किंग म्हटले आहे आणि तो त्याचा खूप चांगला मित्र असल्याचेही लिहिले आहे.
आधीही केली होती प्रशंसा : पाउलोने शाहरुख खानचे कौतुक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2017 मध्ये 'माय नेम इज खान' या चित्रपटाला 7 वर्षे पूर्ण झाली तेव्हा पाउलोने शाहरुखचे कौतुक केले होते. यावर पाउलोने लिहिले की, 'माय नेम इज खान सारख्या अप्रतिम चित्रपटाच्या 7 व्या वर्धापनदिनानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा'. 'माय नेम इज खान और मैं टेरेरिस्ट नहीं' हा चित्रपटाचा प्रसिद्ध संवादही त्याने या पोस्टसोबत शेअर केला होता. ब्राझिलियन लेखक आणि गीतकार पाउलो कोएल्हो यांच्या प्रमाणेच जगभरातील अनेक चित्रपट क्षेत्रातील जाणकारदेखील पठाणचे मनापासून कौतुक करत आहेत.
शाहरुखनेही व्यक्त केले आभार शाहरुखनेही क्षणाचाही विलंब न लावता पाउलो कोएल्होचे कौतुक करणाऱ्या पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिली. शाहरुखने लिहिले की, 'खूप खूप धन्यवाद, मला तुम्हाला समोरासमोर भेटायचे आहे, तुम्ही निरोगी आणि आनंदी रहावे'.
शाहरुखला पुन्हा दिग्दर्शित करणे सन्मानाची गोष्ट : पठाण आदित्य चोप्राच्या गुप्तचर विश्वाचा एक भाग आहे आणि त्यात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम आहेत. चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर, मीडियाशी अलीकडील संवाद साधून, SRK आणि सिद्धार्थ आनंद यांनी पठाणच्या सिक्वेलचे संकेत दिले. पठाण 2 मध्ये तो मोठा आणि चांगला असेल, असे SRK म्हणाला, तर सिद्धार्थ म्हणाला की सुपरस्टारला पुन्हा दिग्दर्शित करणे ही सन्मानाची गोष्ट आहे.